औरंगाबादच्या नामांतराची भूमिका शिवसेनेची, सरकारची नाही ! – प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विचार करून नव्हे; तर मुसलमानांच्या लांगूलचालनावरून त्यांची भूमिका ठरवणारे राजकीय पक्ष !

मुंबईमध्ये ‘अँटिबॉडीज्’ रोखू न शकणारा कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याविषयी तज्ञांमध्ये मतमतांतरे

मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये मानवी शरिरातील प्रतिपिंडांना (अँटिबॉडीज्) भारी पडणारा कोरोनाचा नवा विषाणू आढळला आहे. मुंबई उपनगरातील खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये हा विषाणू आढळला आहे.

भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला ८ जानेवारीच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

समुद्रकिनार्‍यावर मद्यपान केल्यास व्यक्तीसाठी २ सहस्र रुपये, तर गटासाठी १० सहस्र रुपयांचा दंड

सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या उपद्रवांना आळा घालण्यासाठी गोवा शासनाने कायदा केल्यानंतर आता पर्यटन खात्याकडून गोव्यातील सर्व समुद्रकिनार्‍यांवर पर्यटकांनी सुमद्रकिनार्‍यावर कोणत्या गोष्टी करू नयेत यासंबंधीचे फलक उभारण्यात आले आहेत.

हत्या करण्यासाठी गोवंशीय आणि अन्य जनावरे बाळगल्याप्रकरणी १८ धर्मांधांवर गुन्हा नोंद

गुन्हेगार धर्मांधांवर कठोर कारवाई केल्यासच गोहत्या रोखण्यात यश येऊ शकते, त्यामुळे या प्रकरणाचे सखोल अन्वेषण होऊन आरोपींवर वरवर कारवाई न करता कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !

पत्रकारांना हक्कांसाठी लाचार होण्याची वेळ येऊ देणार नाही ! – सुधीर केरकर, संचालक, माहिती आणि प्रसिद्धी खाते

निवृत्त झालेले संपादक आणि पत्रकार यांची माहिती गोळा करून त्यांना माहिती अन् प्रसिद्धी खात्यात सामावून घेण्यात येईल. संचालकपदी असेपर्यंत पत्रकारांना हक्कासाठी लाचार होण्याची वेळ येऊ देणार नाही’, असे आश्‍वासन माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सुधीर केरकर दिले.

बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जेरबंद

अशा राष्ट्रद्रोहींना नेमकी फूस कोणाची आहे, त्याची पाळेमुळेही शोधली पाहिजेत !

पू. भिडेगुरुजी यांना वढू (पुणे) येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी थांबण्यास पोलिसांकडून मज्जाव

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी ९ जानेवारी या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. भिडेगुरुजी हे वढु बुद्रुक या ठिकाणी मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत आले होते.

सोलापूर येथील श्री सिद्धरामेश्‍वर मंदिराच्या परिसरात जमावबंदीचा आदेश

यात्राकाळात केवळ पासधारक भाविकांनाच धार्मिक विधीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येईल. लोकप्रतिनिधी आणि अतीमहनीय व्यक्ती यांनाही यात्राकाळात प्रवेश देण्यात येणार नाही. ग्रामीण भागातून यात्रेसाठी भाविकांनी शहरात येऊ नये यासाठी शहर आणि ग्रामीण पोलीस यांंच्या संयुक्त पथकांद्वारे शहराभोवती नाकाबंदी करण्यात येणार आहे

केंद्राकडून शिष्यवृत्तीसाठी ५९ सहस्र कोटी रुपयांची तरतूद ! – सुनील कांबळे, भाजप

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने ५९ सहस्र रुपयांची तरतूद केली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते. असे असतांना विरोधक केंद्र सरकारवर खोटा आरोप करत आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनिल कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केले.