श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अंबरनाथ तालुक्यातील धारकार्‍यांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाचे अंबरनाथ तालुक्यातील सर्व धारकरी बंधू आणि भगिनी यांनी पूजन करून वंदन केले.

(म्हणे) ‘श्रीक्षेत्र माहूर येथील रेणुकादेवी मंदिरात महिला पुजारी नेमावा !’ – तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड

धर्मांधांकडून लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदु मुलींवर होणारे अत्याचार, महिलांवरील बलात्कार आदी दूर करण्यासाठी यांनी कधी आवाज उठवला आहे का ? यावरून स्त्रीमुक्ती, महिला सक्षमीकरण आदी मागण्या किती पोकळ आहेत, हेच दिसून येते !

प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हावे, असे अनेक घटकांचे मत ! – शासन नियुक्त भास्कर नायक समितीचा अहवाल

भाषांतर म्हणजे धर्मांतर आणि धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर हे शासनाने लक्षात घेऊन त्वरित प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेतूनच देण्यास प्रारंभ करावे !

लोकांना प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मण सवदी यांचे वक्तव्य ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

(म्हणे), ‘मुंबई कर्नाटकची असून त्यावर आमचा अधिकार आहे !’ – लक्ष्मण सवदी, उपमुख्यमंत्री, कर्नाटक

धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर असे शहरांचे नामकरण करा !

या मागणीसाठी हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने शहरातून पायी फेरी काढण्यात आली, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

गूगल भाषांतराच्या मर्यादेमुळे भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर खासदार रक्षा खडसे यांचा नावाचा आक्षेपार्ह अर्थ !

गृहमंत्र्यांच्या पोस्टवर रक्षा खडसे म्हणाल्या, त्यांनी आक्षेपार्ह उल्लेखाची नोंद घेतली, ही चांगली गोष्ट आहे; मात्र त्यांनी ती पोस्ट इतरांना पाठवायला नको होती.

सावंतवाडी तालुक्यातील माजगांव येथील श्री सातेरीदेवीचा जत्रोत्सव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजगांव, सावंतवाडी येथील श्री सातेरीदेवी महिषासुरमर्दिनीचा वार्षिक जत्रोत्सव पौष कृष्ण पक्ष प्रतिपदा २९ जानेवारी २०२१ या दिवशी साजरा होत आहे. यानिमित्त देवीची, तसेच देवस्थानची माहिती देत आहोत.

कलेचा वापर भारतमाता आणि हिंदूंच्या देवतांची विटंबना यांसाठी करणे अयोग्य ! – पद्मश्री पुरस्कारप्राप्त परशुराम गंगावणे

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती  समिती यांच्या वतीने श्री. परशुराम गंगावणे यांच्या पिंगुळी गुढीपूर येथील निवासस्थानी भेट घेऊन विशेष अभिनंदन करण्यात आले.

म्हादईप्रश्‍नी आवश्यकता भासल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ देहलीला नेणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

म्हादईप्रश्‍नी गोवा शासन सुस्त धोरण अवलंबत असल्याच्या आरोपावरून विरोधी सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते.

क्रांतीवर दीपाजी राणे यांच्या क्रांतीला राष्ट्रीय मान्यता द्या !

क्रांतीवीर दीपाजी राणे यांनी पोर्तुगिजांच्या विरोधात नाणूस किल्ल्यावर क्रांती केली होती. या पहिल्या सशस्त्र क्रांतीला संपूर्ण भारतात प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे या क्रांतीला राष्ट्रीय मान्यता द्यायला हवी, अशी मागणी मराठी राजभाषेचे कार्यकर्ते मच्छिंद्र च्यारी यांनी केली.