पितांबरी आस्थापनात महिला दिनाच्या निमित्ताने तेजस्विनी पुरस्कार प्रदान !

डावीकडून श्री. परीक्षित प्रभुदेसाई, सौ. तनिशा खरोसे, सौ. शैलजा शेट्टी आणि श्री. रवींद्र प्रभुदेसाई

ठाणे – पितांबरी आस्थापनाच्या आर्ट डायरेक्टर सौ. शैलजा शेट्टी यांना प्रथम आणि इ-कॉमर्सच्या बिझनेस डेव्हलपमेंट पदाचे दायित्व सांभाळणार्‍या सौ. तनिशा खरोसे यांना द्वितीय क्रमांकाच्या ‘तेजस्विनी पुरस्कार २०२१’ने त्यांच्या आस्थापनात गौरवण्यात आले. ८ मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने झालेल्या एका छोट्या कार्यक्रमात पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई आणि उपाध्यक्ष श्री. परीक्षित प्रभुदेसाई यांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

पितांबरी आस्थापनात ९० महिला सहकारी कार्यरत आहेत आणि एकूण कर्मचार्‍यांमध्ये महिलांचे प्रमाण ३५ टक्के आहे. ज्या महिलांनी त्यांच्या विशेष गुणांच्या आधारे विशेष प्रगती करून पितांबरी आस्थापनाच्या यशात योगदान दिले अशा १० महिलांची निवड करून त्यांना २०१२ करिता नामांकित करण्यात आले. त्यात सर्वाधिक मते मिळालेल्या या २ महिलांना गौरवण्यात आले.

या वेळी श्री. रवींद्र प्रभुदेसाई म्हणाले की, प्रामाणिकपणा आणि मेहनती वृत्ती महिलांमध्ये अधिक असते.