मुंबई, १९ मार्च (वार्ता.) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या व्यतिरिक्त येणार्या नागरिकांना आमदारांचे पत्र किंवा प्रशासकीय अधिकारी यांची अनुमती बंधनकारक करण्यात आली आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांना १ दिवसआड मंत्रालयात येण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार १५ मार्चपासून १ दिवसआड ५० टक्के कर्मचारी उपस्थित रहात आहेत. यांसह सर्वांना मास्क, सॅनिटाईझर यांचा उपयोग करणे बंधनकारक करण्यात आले आहे.