विद्यापिठात असलेली मराठेशाहीपासूनची दुर्मिळ चित्रे धूळ-बुरशीत खितपत !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे अक्षम्य दुर्लक्ष

विशाळगडाच्या विषयाच्या संदर्भात लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करू !

विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरवस्था, तसेच या संदर्भातील विविध समस्यांविषयी लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करू. यानंतर २ मासांच्या कालावधीत त्यावर काहीच हालचाल न झाल्यास पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करू,..

‘फोन टॅपिंग’मधील सहभागाविषयी देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी व्हावी !  – जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

अधिकारी, आमदार यांच्या ‘फोन टॅपिंग’मध्ये सहभागी असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराचे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अन्वेषण व्हावे !

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराचे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अन्वेषण करण्यात यावे, अशी मागणी गृहदलरक्षक दलाचे महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

विशेष सेवेविषयी सनातनच्या साधिका प्रधान चल तिकीट परीक्षक अमरजा आठल्ये रेल्वेकडून सन्मानित !

रेल्वेतील विशेष सेवेविषयी मध्य रेल्वेच्या प्रधान चल तिकीट परीक्षक आणि सनातनच्या साधिका सौ. अमरजा आठल्ये यांना रेल्वे प्रशासनाकडून विशेष पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

राज्यातील आमदारांचे विवाहबाह्य संबंध आहेत का ? याची चौकशी व्हावी ! – कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांचे विधान

एका राज्याचे मंत्री असे विधान करतात, याचा अर्थ त्यांच्याकडे काहीतरी माहिती नक्कीच असणार ! रामराज्यासाठी धर्माचरणी शासनकर्त्यांचे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हवे !

राज्याच्या अपयशाविषयी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मुख्यमंत्री बोलत नसतील, तर घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी या प्रकरणांविषयी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सोलापूर विद्यापिठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’ !

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विद्यापीठ प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे परीक्षा संचालक शाह यांनी सांगितले.

पुण्यातील कारागृह अधीक्षकांनी मागितली राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची अनुमती !

पोलीस खात्यातील अनेक अधीक्षक दबावाखाली काम करत असल्याचेही सांगत त्यांच्यावर झालेली कारवाई ही सूडबुद्धीने केली असल्याचा आरोप हिरालाल जाधव यांनी केला आहे.

सरकारला अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रपती राजवटीची मागणी ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

 मंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले, महाराष्ट्र पोलिसांचे जगभर नाव असतांना दुसर्‍या यंत्रणेकडून अन्वेषण करा, असे म्हणायचे म्हणजे महाराष्ट्र पोलिसांवर अविश्वास दाखवल्यासारखेच आहे.