राज्यातील आमदारांचे विवाहबाह्य संबंध आहेत का ? याची चौकशी व्हावी ! – कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांचे विधान

टीकेनंतर विधान मागे घेत असल्याचे निवेदन

एका राज्याचे मंत्री असे विधान करतात, याचा अर्थ त्यांच्याकडे काहीतरी माहिती नक्कीच असणार ! जर असे असेल, तर राजकारण्यांची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हे लक्षात येते ! असे राजकारणी समाजाला कधीतरी नैतिकता शिकवू शकतात का ? असे राजकारणी जनहित साधणारी व्यवस्था निर्माण करू शकतात का ? रामराज्यासाठी धर्माचरणी शासनकर्त्यांचे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हवे !

के. सुधाकर

बेंगळुरू (कर्नाटक) – जे लोक मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र यांच्याप्रमाणे वर्तन करत आहेत, त्यांना मी आव्हान देतो की, सर्वच्या सर्व २२५ आमदारांच्या खासगी आयुष्याची चौकशी करण्यात यावी. त्यातून लक्षात येईल की, कुणाचे किती अवैध संबंध अथवा विवाहबाह्य संबंध आहेत, असे विधान कर्नाटकातील भाजप सरकारमधील आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी केले होते. त्यावर सर्वच स्तरातून टीका होऊ लागल्यावर त्यांनी त्यांचे विधान मागे घेतले आहे.

सुधाकर विधान मागे घेतांना म्हणाले की, जेव्हा काँग्रेस जाणीवपूर्वक माझ्यासह ६ मंत्र्यांना अपकीर्त करण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा कुणालाच त्रास झाला नाही; मात्र मी केवळ आत्ममंथन करण्यास सांगितले, तेव्हा सर्वांनाच त्रात झाला. माझे त्यांना निवेदन आहे की, माझे विधान शब्दशः न घेता त्यामागील माझा आक्रोश समजून घेण्याचा प्रयत्न करावा.