गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराचे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अन्वेषण व्हावे !

परमबीर सिंह यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी

डावीकडून परमबीर सिंह आणि अनिल देशमुख

मुंबई – गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराचे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अन्वेषण करण्यात यावे, अशी मागणी गृहदलरक्षक दलाचे महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

या याचिकेमध्ये परमबीर सिंह यांनी त्यांना आयुक्तपदावरून हटवण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. प्रतिमासाला १०० कोटी वसुली करण्याचे टार्गेट अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दिले असल्याविषयी गृहमंत्र्यांची चौकशी करावी, अशी मागणी परमबीर सिंह यांनी न्यायालयात केली आहे.