ठाणे येथील गोखले रोड येथे पितांबरी शॉपीचे उद्घाटन !

पितांबरीची सर्व उत्पादने या पितांबरी शॉपीमध्ये मिळतीलच; परंतु त्यासह पितांबरीची नवीन उत्पादनेही येथे ग्राहकांना सर्वप्रथम खरेदी करता येतील.

मुंबईतील झोपडपट्ट्यांतील धर्मांध महिलांचा अमली पदार्थांच्या अवैध धंद्यात मोठा सहभाग

जे सामान्यांना ठाऊक असते, ते पोलीस आणि शासन यांना ठाऊक नसते असे नव्हे. अवैध धंदे चालणार्‍या सर्वच ठिकाणांवर धाडी टाकून ते धंदे पूर्णतः संपवण्याची इच्छाशक्ती कोणते सरकार आणि त्यांचे पोलीस राबवणार ?, हा प्रश्न आहे !

वीजचोरी करणार्‍यांच्या विरोधात पश्‍चिम महाराष्ट्रात महावितरणची धडक कारवाई

वीजतारांवर आकडे टाकून किंवा मीटरमध्ये फेरफार करून विजेचा उपयोग करणार्‍या वीज चोरांविरोधात महावितरणने धडक कारवाई चालू केली आहे, अशी माहिती प्रादेशिक संचालक प्र. नाळे यांनी दिली. 

सातारा येथे शिवसेनेचे इंधन दरवाढीच्या विरोधात ढकल स्टार्ट आंदोलन

शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत इंधन दरवाढीविरोधात शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालय असे ढकल स्टार्ट आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी हाताने बंद गाडी ओढत आंदोलन केले.

कोरोनाचे नियम मोडणार्‍या मुंबई येथील ५७ सहस्रांहून अधिक नागरिकांवर गुन्हे नोंद

आपत्कालीन स्थितीतही नियमांचे पालन न करणार्‍या जनतेची आपत्कालामुळे हानी झाली, तर त्याला ती स्वतःच उत्तरदायी असेल !

जीवनाच्या वाटचालीत स्वामी समर्थांचे आशीर्वाद महत्त्वाचे ! – धवलसिंह मोहिते-पाटील

मी आणि माझे कुटुंबीय स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत. यामुळे माझ्या जीवनाच्या वाटचालीत कोणत्याही नवीन कार्याचा प्रारंभ करतांना स्वामी समर्थांचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत.

आर्थिक अपव्यवहार आणि अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याच्या प्रकरणी तत्कालीन विश्‍वस्तांविरुद्ध गुन्हा नोंद करावा !

आर्थिक अपव्यवहार झाला असेल, तर संबंधितांना शिक्षा व्हायलाच हवी; मात्र हिंदूंच्या धर्मशास्त्राशी निगडित विषयांत माननीय न्यायालयाने शंकराचार्य किंवा हिंदूंचे धर्मगुरु यांचे मत विचारात घ्यावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

केंद्रीय अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाला दिलासा, मूलभूत प्रश्‍न दुर्लक्षित राहिल्याची उद्योजकांची खंत

दळणवळण बंदी शिथिल झाल्यानंतर उद्योगाला गती मिळाली आहे; परंतु कापूस, सुताचे चढे भाव आणि कापडाला अपेक्षित न मिळणारी किंमत यामुळे एकूणच या क्षेत्रातील उलाढाल अल्प होत आहे.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण करून त्यांच्या मैत्रिणीचा विनयभंग केल्याचा गुन्हा नोंद !

तक्रारनुसार अमन चढ्ढा, मनीष आनंद यांच्यासह सहा जणांवर सी.आर्.पी.सी. १५६ (३) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

राज्यशासनाच्या यशवंत पंचायत राज अभियानात पुणे क्षेत्रीय विभागात कोल्हापूर जिल्हा परिषद प्रथम क्रमांकावर

या अभियानातील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा परिषद कोल्हापूरसह दोन्हीही विजेत्या पंचायत समितीचे प्रस्ताव पाठवले जाणार आहेत.