संभाजीनगर येथे दळणवळण बंदीच्या भीतीने १० टक्के परप्रांतीय कामगार गावांकडे रवाना !

संभाजीनगर – कोरोनामुळे पुन्हा मोठी ‘दळणवळण बंदी’ घोषित होण्याच्या भीतीपोटी वाळूज औद्योगिक परिसरातून परप्रांतीय कामगारांची ४-५ कुटुंबे प्रतिदिन सर्व साहित्य घेऊन खासगी वाहनाने मूळ गावी परत जात आहेत. १० टक्के परप्रांतीय कामगार गावाकडे जात आहेत. सध्या येथे अनुमाने १ लाख कामगार असून त्यातील २ सहस्र कामगार गावाकडे गेले आहेत. ८ टक्के जाण्याच्या सिद्धतेत आहेत. पुढे हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्योजक आणि ठेकेदार यांनी ‘तुमची काळजी घेतो; पण संभाजीनगर सोडू नका’, अशा शब्दांत विनवणी केली.