
मुंबई – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून सचिन वाझे यांचे अन्वेषण चालू आहे. महाविकास आघाडीचे नेतेच वाझे यांचे खरे मालक आहेत. वाझे यांच्या चौकशीतून काय बाहेर येईल ? या भीतीने महाविकास आघाडीचे नेते अस्वस्थ झाले आहेत, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर केली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मुंबई किंवा महाराष्ट्र पोलीस यांची अपकीर्ती आम्ही केली नाही. ज्यांनी वाझे यांची नियमबाह्य नियुक्ती केली, तेच पोलिसांची अपकीर्ती करत आहेत. पोलिसांच्या सी.सी.टी.व्ही.चा ‘डी.व्ही.आर्.’ गायब केला, तरी त्याचा पूर्ण ‘बॅकअप’ मुख्य ठिकाणी साठवला जात असतो. कुणी एक माणूस ते नष्ट करू शकत नाही, अशी व्यवस्था आहे.’’
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !