पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुखदर्शन सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधीत घेता येणार आहे. ‘ऑनलाईन’ बुकिंग केलेल्या दीड सहस्र भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार चालू रहाणार असून त्यात कोणताही खंड पडणार नाही, तसेच येणारे सण आणि उत्सवही परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला असल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.