श्रीरामनवमी उत्सवाच्या वेळी दंगली करणार्यांवर कठोर कारवाई करा !
सोलापूर, २६ एप्रिल (वार्ता.) – पाकिस्तानमध्ये रहाणार्या अल्पसंख्यांक हिंदूंवर, तसेच हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर होणार्या आक्रमणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तेथील हिंदूंचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ही आक्रमणे रोखण्यासाठी भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार या ठिकाणी झालेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’च्या माध्यमातून करण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके, श्री. किशोर जगताप, श्री. कृष्णहरि क्यातम, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ढगे, धर्मप्रेमी देविदास सत्तारवाले, श्री. आनंद कोंडा यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिक सहभागी झाले होते.
यंदाच्या वर्षीही महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, देहली, कर्नाटक, पश्चिम बंगाल, झारखंड आदी अनेक राज्यांत श्रीरामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकांवर दगडफेक करून हिंसाचार घडवण्यात आला. मागील वर्षीही श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमणे झाली होती. श्रीरामनवमीच्या दिवशी झालेले आक्रमण, हे एक सुनियोजित षड्यंंत्र असून एकाच वेळी इतक्या ठिकाणी दंगली कशा घडल्या ? यामागे कुणाचा हात आहे ? या सर्व घटनांची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती गठीत करावी आणि सार्वजनिक संपत्तीच्या झालेल्या हानीची भरपाई दोषींकडून वसूल करण्यात यावी. तसेच उत्तरप्रदेशातील योगी सरकारप्रमाणे दंगलखोरांच्या घरांवर बुलडोझर चालवून त्यांच्यावर वचक निर्माण करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
लातूर येथे हिंदु जनजागृती समितीने दिले निवेदन !लातूर – देेशभरात श्रीरामनवमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रा-मिरवणुका यांवर आक्रमण करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना देण्यात आले. या प्रसंगी धर्मप्रेमी श्री. नंदकिशोर पोद्दार आणि श्री. ओंकार पोद्दार, सौ. अंजली पोद्दार, सौ. मनीषा ठेसे, सौ. नंदिनी स्वामी, सौ. सुनीता तावस्कर, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री देशमुख उपस्थित होत्या. |