सोलापूर, ११ एप्रिल (वार्ता.) – येथील जुना विडी घरकूल परिसरातील महिलेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी मेहबूब शेख नावाच्या रिक्शाचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मेहबूब सध्या पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मेहबूबने पीडित महिला रिक्शातून प्रवास करतांना कुटुंबाविषयी ‘तुझ्या घरात कोण कोण रहातात’, अशी विचारणा केली. यामुळे महिला घाबरली. मेहबूब याने महिला ज्या ठिकाणी रिक्शातून उतरली तेथून पाठलाग करत तिचे घर शोधून काढले. (अशा प्रकारांना आळा बसण्यासाठीच राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा अस्तित्वात यावा, असे हिंदूंना वाटते ! – संपादक)
‘लव्ह जिहाद’च्या उद्देशाने घडलेल्या प्रकारामुळे महिलेने पतीसमवेत पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट केली. तक्रारीत म्हटले आहे की, मेहबूब शेख याला महिलेचे किराणा दुकान असल्याचे समजले. त्यानंतर त्याने काहीतरी खरेदी करण्याच्या निमित्ताने किराणा दुकानात जाऊन वस्तू घेत असतांना महिलेचा हात धरून लज्जास्पद भाषा वापरली. या प्रकारानंतर हिंदूराष्ट्र सेना आक्रमक झाली असून जिहादी मानसिकतेच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी हिंदूंनी ‘लव्ह जिहाद’विषयी परिवारामध्ये जागृती करावी, असे आवाहन केले आहे.
प्रतिक्रिया
वेळ आल्यास ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात पुन्हा रस्त्यावर उतरू ! – अंबादास गोरंटला, समन्वयक, हिंदु गर्जना मोर्चा
सोलापूरात ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने हिंदूंनी एकत्र येत ‘हिंदु गर्जना मोर्चा’ काढला. ‘लव्ह जिहाद’च्या दृष्टीकोनातून पुन्हा पुन्हा असे प्रकार होत असतील, तर आम्ही सहन करणार नाही. वेळ पडल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू.
‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात पालकांनी जागृती करावी ! – रवि गोणे, शहरप्रमुख, हिंदुराष्ट्र सेना
सोलापूरमध्ये कुठेही हिंदु महिलांची छेड किंवा जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्यास हिंदुराष्ट्र सेनेशी संपर्क करा. हिंदु राष्ट्र सेना कायद्याच्या चौकटीत राहून समस्येचे निराकरण करेल, तसेच ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात पालकांनी त्यांच्या मुली आणि भगिनी यांच्यामध्ये जागृती करावी.