कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात २ सहस्र ८९० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई !

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात ८८ लाख रुपयांची रोख रक्कम, मद्य, रसायन, गांजा असा ४ कोटी ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सोलापूर विद्यापिठाच्‍या प्रभारी कुलगुरुपदी डॉ. आर्.के. कामत यांची निवड !    

पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्‍या प्रभारी कुलगुरुपदी डॉ. आर्.के. कामत यांची राज्‍यपाल रमेश बैस यांनी निवड केली आहे. याविषयीचे पत्र कुलपती कार्यालयाकडून देण्‍यात आले आहे.

डाळींची साठेबाजी रोखण्‍यासाठी मिल-गोदामांनी प्रशासनास सहकार्य करावे ! – मिलिंद शंभरकर, जिल्‍हाधिकारी, सोलापूर

या वेळी शंभरकर म्‍हणाले, ‘‘पडताळणीसाठी आलेल्‍या पथकांना आवक-जावक रजिस्‍टर आणि अन्‍य सर्व कागदपत्रे उपलब्‍ध करून द्यावीत. संकेतस्‍थळावर सत्‍य माहिती भरावी.’’

पंढरपूर येथील तुळशी वृंदावनाच्या संपूर्ण कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश !

या प्रकारामुळे वृंदावनाच्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

अवेळी पावसामुळे अनेकांचा संसार उघड्यावर; शेतीपिकांना मोठा फटका !

बुलढाणा, चंद्रपूर, सोलापूर, अमरावती आणि बीड या जिल्‍ह्यांत वादळी वार्‍यासह अवेळी पावसाने उपस्‍थिती लावली आहे. यामध्‍ये शेती पिकांसह घरांचीही मोठी हानी झाली आहे. अनेकांचा संसार या वादळी पावसामुळे उघड्यावर पडला आहे.

सोलापूर जिल्ह्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने शेतीपिकांची हानी !

सलग २७ आणि २८ एप्रिल या दिवशी वादळी वार्‍यासह झालेल्या अवेळी पावसामुळे विजेचे खांब अन् अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. अचानक आलेल्या पावसाने शेतीतील पिकांची मोठी हानी झाली.

स्‍वातंत्र्यवीर सावरकरांच्‍या विरोधातील वक्‍तव्‍यप्रकरणी प्रणिती शिंदे यांनी क्षमा मागावी !

प्रणिती शिंदे यांनी क्षमायाचना करावी, अशी मागणी हिंदु राष्‍ट्र सेनेचे शहर प्रमुख रवि गोणे यांनी पत्रकार परिषदेत केली. या वेळी विलास पोतू, आनंद मुसळे, सचिन जोशी, लिंबाजी जाधव आदी उपस्‍थित होते.

करमाळा तालुक्‍यातील (सोलापूर) श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्‍यावर प्रशासकाची नियुक्‍ती !

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्‍यावर सध्‍या बागल गटाची सत्ता होती. ‘आदिनाथ कारखाना बारामती अ‍ॅग्रो’ला भाडेतत्त्वावर देण्‍याची प्रक्रिया रहित करून कारखाना सहकारी तत्त्वावर ठेवण्‍यात आला होता

सोलापूरची ऑक्‍सिजन पातळी वाढवण्‍यासाठी ५०० एकर भूमीवर उभारणार वनउद्यान !

सोलापूर शहरातील ऑक्‍सिजनची पातळी वाढवण्‍यासाठी शहरातील ५०० एकर वनभूमीवर वनउद्यान उभारण्‍यात येणार असल्‍याची घोषणा राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य आणि मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

अक्‍कलकोट देवस्‍थानच्‍या नावे भामट्यांकडून भाविकांची लूट !

देवस्‍थानांच्‍या नावे लूट केल्‍याने अनेक पटींनी पाप लागते, हे समजण्‍यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्‍यक !