रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा अर्ज प्रविष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षांत केलेले काम हा केवळ ‘ट्रेलर’ होता. ते तिसर्‍यांदा पंतप्रधान झाल्यानंतर देश महासत्ता बनेल.

आचारसंहितेचा भंग करणार्‍या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रहित करा ! – अतुल लोंढे

लोकसभा निवडणूक प्रचार चालू झाल्यापासून सत्ताधारी भाजप, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे आणि त्या संदर्भातील रितसर तक्रारही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून आवेदन प्रविष्ट !

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनीही हातकणंगले मतदारसंघासाठी आवेदन प्रविष्ट केले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी आवेदन प्रविष्ट केले.

आताचे महाराज खरे वारसदार नसून ते दत्तक आले आहेत ! – संजय मंडलिक, खासदार, शिवसेना

चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे महायुतीची अनुकूलता विजयात परावर्तित होईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेव्हापासून हिंदुत्वाचे सूत्र मनसेने हाती घेतले, तेव्हापासून त्यांची आणि आमची जवळीक वाढली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांना जाहीरपणे पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती.

‘मला श्री सिद्धिविनायकाला उत्तर द्यायचे आहे’, या भावाने मी सेवा केली ! – आदेश बांदेकर, माजी अध्यक्ष, श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट, मुंबई

बांदेकर यांच्यावर मंदिरातील भ्रष्टाचाराच्या संदर्भात आरोप झाले होते. २३ जून २०२३ पर्यंत त्यांची या पदावर नियुक्ती होती. त्यांच्या जागी शिवसेनेने सदा सरवणकर यांची नियुक्ती केली आहे.

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) नगरपरिषदेचा पाण्याचा बंब दुरुस्त न केल्यास आंदोलन करणार ! – संतोष परब, युवासेना

अशी चेतावणी द्यावी लागणे नगरपरिषद प्रशासनाला लज्जास्पद ! असा हलगर्जीपणा करणारे आपत्काळात जनतेचे रक्षण कसे करणार ?

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा !; संजय निरूपम शिवसेनेत जाण्याची शक्यता !…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा ‘टीझर’ (विज्ञापन) प्रसारित करण्यात आला आहे. ९ एप्रिलला शिवतीर्थावर येण्याचे आमंत्रण यात देण्यात आले आहे.

भावना गवळी यांना वार्‍यावर सोडणार नाही ! – मुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ-नांदेड मतदारसंघात हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी घोषित केली. तेथे गेल्या २५ वर्षांपासून खासदार असलेल्या भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यात आली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच, यावर आम्ही आजही ठाम ! – उद्योगमंत्री उदय सामंत

कोकण विभागात भाजपला जागा नसल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर भाजपने दावा केला आहे.