Maharashtra New CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री !
५ डिसेंबरला होणार शपथविधी !
५ डिसेंबरला होणार शपथविधी !
५ डिसेंबर या दिवशी आझाद मैदानात साधूसंतांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
सत्तेमधील पदाची मला कुठलीही लालसा नाही. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच मी नेटाने काम करणार आहे. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही, असे स्पष्टीकरण खासदार श्रीकांत शिंदे यांनी ‘एक्स’ खात्याद्वारे दिले आहे.
ज्याचे अधिक आमदार, त्या पक्षाकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असे आहे. मी आता तिसर्यांदा आमदार झालो असल्याने मी पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहे, असे उत्तर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आणि राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांना सांगितले.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करून त्यांचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या वरिष्ठ नेते घेतील तो निर्णय मान्य असेल, असे घोषित केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाने भाजपला मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन दिले आहे.
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना २६ नोव्हेंबर या दिवशी दूरभाष करून ‘मुख्यमंत्रीपदासाठी माझा कोणताही अडसर नाही’, असे सांगितले आहे. मुख्यमंत्रीपदाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील, तो शिवसेनेला मान्य असेल.
एकनाथ शिंदे यांनी २५ नोव्हेंबरच्या रात्री १२.५३ वाजता ‘एक्स’ खात्यावरून ‘माझ्या समर्थनार्थ वर्षा निवासस्थानी किंवा अन्य कुठे एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आणि यापुढेही राहील’, असा संदेश प्रसारित केला आहे.
महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक निकाल आहे. लोकांनी मतांचा, प्रेमाचा वर्षाव महायुतीवर केला आहे. सर्वच घटकातील लोकांनी महायुतीवर प्रेम दाखवले, त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो.
जनतेने घराणेशाहीला झिडकारत लोकशाहीला कौल दिला. त्यामुळे लोकशाहीचा विजय झाला. – आशिष शेलार, भाजप