शाळांमध्ये होणार्‍या बहिष्कारामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम ही पालकांसाठी चेतावणी !

प्रतीकात्मक छायाचित्र

वेस्ट लंडनमधील हौनस्लो येथील ‘स्प्रिंगवेल’ या शाळेत एक घटना घडली. या शाळेतील ३ मुसलमान मुलांनी त्यांच्यासमवेत शिकणार्‍या हिंदु मुलाचे बळजोरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. ही ३ मुले हिंदु मुलाला त्याने परिधान केलेला पवित्र धागा तोडून टाकण्यास, तसेच त्याचे नाव पालटून ‘महंमद’ हे घेण्यास त्याच्यावर दबाव आणत होती. तो मुलगा शाकाहारी असतांना त्याला ते हलाल (इस्लामनुसार जे वैध ते) मांस खाण्याचे आमीष दाखवत होती. ‘हे सर्व न केल्यास आपल्यामधील मैत्री संपेल आणि आम्ही तुला सहकार्य करणार नाही’, अशी धमकी ते त्याला देत होते.

या मुसलमान मुलांनी त्या हिंदु मुलावर ‘आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर तुझ्यावर बहिष्कार टाकू’, अशी धमकी दिली. मैत्रीचा लाभ घेऊन अशा प्रकारे बळजोरी करणे, हा प्रकार काळजी करण्यासारखा आहे. या परिस्थितीची त्या हिंदु मुलाच्या वडिलांना कल्पना आल्यानंतर त्यांनी शाळेत हा प्रकार सांगितला. शाळेने त्या मुलांवर काहीही कारवाई न केल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. यावरून शाळेतील गुंडगिरी आणि धर्मांतरााविषयी केलेली बळजोरी यांवर कारवाई करण्याविषयी शाळेची निष्क्रीयता दिसून आली. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्या शाळेने तक्रारीची नोंद घेऊन त्या ३ मुसलमान मुलांना शाळेतून निलंबित केले. यामुळे अशी कारवाई त्या शाळेने प्रारंभी का केली नाही ? असा प्रश्न उपस्थित होतो.

१. धार्मिक शिकवणीचा लहान मुलांवर होणारा परिणाम

श्री. नारायण नाडकर्णी

लहान मुलांवर लहान घटनांचा परिणाम होत असतो. त्यामुळे त्यांच्या मित्रांच्या (इस्लामी) विचारसरणीचा त्यांच्यावर सहज परिणाम होऊ शकतो. या घटनेवरून कट्टर धार्मिक शिकवणीचा मुलांवर किती अधिक प्रमाणात परिणाम होतो, हे लक्षात येते. या ३ मुसलमान मुलांनी केलेल्या बळजोरीवरून ही मुले मोठी झाल्यावर भविष्यात समाजात संघर्ष निर्माण करू शकतील, अशी भीती वाटते. मुलांच्या अशा प्रकारच्या दुष्प्रवृत्तीला योग्य मार्गाने वळवले नाही, तर पुढे जाऊन ते समाजामध्ये फूट पाडू शकतील.

२. मुलांवर होणारा परिणाम

एखाद्या लहान मुलावर त्याचा धर्म पालटण्यासाठी दबाव आणल्याने त्या लहान मुलावर मानसिक दृष्टीने खोल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या मनात गोंधळ निर्माण आणि निराशा उत्पन्न होऊन त्याचे मन दुभंगू शकते.

३. लहान मुलांविषयी शैक्षणिक संस्थांची भूमिका महत्त्वाची

वरील घटनेमध्ये शाळेने प्रारंभीला स्वतःचे उत्तरदायित्व न ओळखता दिलेल्या प्रतिसादावरून मुलांमध्ये सहनशीलता आणि दुसर्‍यांना मान देणारे वातावरण निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे, ही शाळांची महत्त्वाची भूमिका असली पाहिजे, हे लक्षात येते. अशा प्रकारचे संवेदनशील प्रश्न परिणामकारकरित्या हाताळून शाळेतील सर्व धर्माच्या विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी शाळा सज्ज असल्या पाहिजेत.

४. धार्मिक सहनशीलता निर्माण करणे आवश्यक !

शाळेत ‘धार्मिक सहनशीलता आणि वेगवेगळ्या धर्मांना मान देण्याचे महत्त्व’, या विषयांवर मुलांचे पालक अन् समाजातील कार्यकर्ते यांमध्ये चर्चा घडवून आणल्याने चांगले सुसंवाद निर्माण करणारे वातावरण सिद्ध होऊ शकते. या घटनेवरून ‘समाजातील सर्व घटकांमध्ये धर्माचा अतिरेक असू नये, ही शिकवण दिली पाहिजे’, हे लक्षात येते.

५. मुलांना योग्य संस्कार असलेले शिक्षण देणे महत्त्वाचे !

लंडनमधील हिंदु मुलाविषयी घडलेल्या या प्रसंगावरून मुसलमान असलेल्या ३ लहान मुलांवर धर्माविषयी करण्यात आलेले संस्कार आणि त्याचे समाजावर झालेले गंभीर परिणाम लक्षात येतात. मुलांमध्ये लहान असतांना जी वृत्ती सिद्ध होईल, त्यावरून ही मुले मोठी झाल्यावर भविष्यातील त्यांचे संबंध आणि त्यांच्यातील परस्पर संवाद काय असेल, हे ठरते. यासाठी पालक, शिक्षण देणारे आणि समाज यांनी एकत्र येऊन एकमेकांना समजून घेणे, एकमेकांचा आदर करणे, असे केल्यास अधिक शांततामय अन् सर्वसमावेशक समाज निर्माण होऊ शकेल.

– श्री. नारायण नाडकर्णी, फोंडा, गोवा.