प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाण उत्सव कांदळी (पुणे) येथे भावपूर्ण वातावरणात साजरा !

‘हरि ॐ तत्सत्’ या नामजपाच्या गजरात सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचा महानिर्वाण उत्सव कार्तिक कृष्ण पक्ष नवमी, म्हणजेच १८ नोव्हेंबर या दिवशी कांदळी, ता. जुन्नर, जिल्हा पुणे येथील त्यांच्या समाधीस्थळी भावपूर्ण वातावरणात साजरा झाला.

कोटी कोटी प्रणाम !

जन्मा येईन भक्ताकाजासी ।
सदा रक्षण त्यांना मजपाशी ।
प्रभूमुखे कथिले हो मजसी ।
सदा सत्य जिवंत मी जाण । – प.पू. भक्तराज महाराज

प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ

प.पू. भक्तराज महाराज यांच्या बर्‍याच भजनांचे अर्थ अनेक साधकांना पूर्णपणे आकलन होत नाहीत. अर्थ समजून घेऊन भजने म्हटली किंवा ऐकली, तर भजने म्हणण्याचा किंवा ऐकण्याचा आनंद द्विगुणित होतो, तसेच भावजागृतीही लवकर होते.

प.पू. भक्तराज महाराज यांच्यासारख्या पूर्णत्वाला पोचलेल्या उच्च कोटीच्या संतांचा लाभलेला सत्संग !

आज १८ नोव्हेंबर या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाणदिन आहे. त्या निमित्ताने…

प.पू. भक्तराज महाराज यांनी शिकवलेले सूत्र आत्मसात् करून ते साधकांना शिकवणारे आदर्श शिष्य डॉ. आठवले !

‘प.पू. बाबांनी (प.पू. भक्तराज महाराज यांनी) प्रसंगातून कसे शिकवले ?’, याविषयीचा एक प्रसंग या ग्रंथात आहे. एका प्रसंगात प.पू. बाबा आणि त्यांचे काही भक्त २ – ३ गाड्यांमधून कोर्लाई या ठिकाणी जात होते. या गाड्या एका पेट्रोल पंपाजवळ पोचल्यावर त्यांतील श्री. केतकर यांची गाडी बंद पडली.

‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग ३)’ या ग्रंथाचे प्रकाशन

भजनांचा सुगम अर्थबोध करून देऊन भजनानंदी डुंबवणारा ग्रंथ !

प.पू. भक्तराज महाराजांनी डॉ. आठवले यांना घरच्यांपासून विरक्ती येण्यासाठी दिवाळीला त्यांच्याकडे बोलवणे !

संसारात राहून साधना करणार्‍यांना घरातील माणसांपासून विरक्ती येण्यासाठी प.पू. भक्तराज महाराज असे करायला सांगायचे.’

प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. जीजी यांच्या (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर) यांच्या अस्थींचे नर्मदा नदीमध्ये विसर्जन

या प्रसंगी प.पू. रामानंद महाराज यांचे पुत्र लोकेश (राजू) निरगुडकर, तसेच श्री. राजू निकम, ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट, इंदौर’चे अध्यक्ष श्री. शरद बापट, कोषाध्यक्ष श्री. विजय मेंढे, विश्वस्त श्री. रवींद्र कर्पे आणि अनेक भक्त या वेळी उपस्थित होते.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. जीजी (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर) यांच्या पार्थिव देहावर श्री क्षेत्र कांदळी (पुणे) येथे अंत्यसंस्कार !

प.पू. जीजींच्या पार्थिव देहाच्या दर्शनासाठी शेकडो भक्त श्री क्षेत्र कांदळी येथे आले होते. कांदळी येथे मध्यरात्रीपासून प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांचा कार्यक्रम चालू होता.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी वात्सल्यमूर्ती प.पू. जीजी (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर) यांचा देहत्याग !

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या (प.पू. बाबांच्या) धर्मपत्नी आणि पू. नंदू कसरेकर यांच्या मातोश्री प.पू. जीजी (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर) (वय ८६ वर्षे) यांनी १८ सप्टेंबर या दिवशी दुपारी २ वाजता नाशिक येथे त्यांचे धाकटे सुपुत्र श्री. रवींद्र कसरेकर यांच्या घरी देहत्याग केला.