श्रीकृष्णाचे चित्र, प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून साधिकेला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

‘प.पू. भक्तराज महाराज’ यांचे छायाचित्र जागृत झाले आहे व त्यांच्या हातातील काठी आणि त्यांचे डोळे अन् मस्तक यांची हालचाल होत आहे’, असे मला जाणवले.

कांदळी (जिल्हा पुणे) येथे श्रीराम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा !

१६ एप्रिल या दिवशी सायंकाळी प.पू. भक्तराज महाराज रचित भजनांचा कार्यक्रम झाला. भक्तजन रात्री उशिरापर्यंत भजनात दंग होते.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतःच्या कृतीतून साधकाला साधनेत कसे घडवतात ?’, याविषयीचा एक प्रसंग !

‘परात्पर गुरु डॉक्टर स्वतः ईश्वर आहेत. त्यांना वरील कृती करण्याची आवश्यकता आहे का ?’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘या सर्व कृती ते मला शिकवण्यासाठी करत आहेत.’

केरळ येथील सौ. सुमा पुथलत यांना मुंबई येथील सेवाकेंद्रात सेवेला जातांना शिकायला मिळालेली सूत्रे

प.पू. डॉक्टर आणि त्यांच्या पत्नी डॉ. (सौ.) कुंदाताई कोणताही भेदभाव न करता सर्व साधकांची अतिशय प्रेमाने काळजी घेत असल्यामुळे तोच प्रेमभाव आम्हा साधकांमधे रुजला जाणे

प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांतील चैतन्याची साधकाला आलेली प्रचीती !

प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावल्यावर फळे येत नसलेल्या झाडालाही फळे येणे

श्रीकृष्णाचे चित्र आणि प.पू. भक्तराज महाराज अन् त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांच्याकडे पाहून साधिकेला जाणवलेली सूत्रे

श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहिले तेव्हा मला जाणवले, श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शनचक्र गरगर फिरत आहे. श्रीकृष्ण उठून येत आहे. चित्र सजीव झाले आहे.

सेवा करतांना सौ. गौरी कुलकर्णी यांना आलेल्या अनुभूती

‘नामजपातूनच सर्व काही साध्य होणार आहे’, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर माझ्याकडून सहजतेने आणि समयमर्यादेत ती सेवा पूर्ण झाली.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादाची फलश्रुती म्हणजे, सनातनच्या सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदेची निर्मिती ! – डॉ. जयंत बाळाजी आठवले

फेब्रुवारी २०२४ पर्यंत ३६५ ग्रंथांच्या १३ भाषांमधील ९५ लक्ष ९६ सहस्र प्रती प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रसिद्ध झालेल्या या संख्येवरून ‘समाजातील जिज्ञासूंना अध्यात्माची आणि शास्त्र समजून घेण्याची आवड किती आहे’, हे लक्षात येते.

प.पू. भक्तराज महाराज यांनी दिव्यत्वाची प्रचीती देऊन साधनामार्गात आणल्याची श्रीमती जयश्री मुळे यांना आलेली अनुभूती !

‘‘माझा एक शिष्य डॉक्टर (शिष्य डॉ. आठवले) आहे. त्यांनी गोव्याला गुरुपौर्णिमा ठेवली आहे. तिकडे या. आता ‘हॉटेल’मध्ये उतरायचे नाही. सरळ आश्रमातच यायचे.’’

प.पू. भक्तराज महाराज यांनी दिव्यत्वाची प्रचीती देऊन साधनामार्गात आणल्याची श्रीमती जयश्री मुळे यांना आलेली प्रचीती !

एका वयस्कर गृहस्थांनी स्वप्नात येऊन ‘ऊठ, आपल्याला संभाजीनगरला जायचे आहे’, असे म्हणून उठवणे आणि ते प.पू. भक्तराज महाराज असल्याचे जाणवणे