‘हलाल जिहाद’, ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात जागृती करण्याचा, तसेच राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याचा निर्धार !

या प्रबोधनामुळे व्यापारी-उद्योजक यांनी ‘हलाल शिक्का’ असलेली उत्पादने विक्रीस न ठेवण्याचा निश्चय केला. ‘हलाल’ संदर्भात व्यापक जनजागृती करू, तसेच प्रत्येकानेच राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

सांगली येथील रिलायन्‍स ज्‍वेल्‍स दरोड्यातील संशयितांची रेखाचित्रे सिद्ध !

मिरज रस्‍त्‍यावरील मार्केट यार्डजवळील वसंत कॉलनीतील रिलायन्‍स ज्‍वेल्‍स या शोरूमवर टाकलेल्‍या दरोड्यात दरोडेखोरांनी १४ कोटी रुपयांचे सोने, हिरे आणि रोकड चोरली होती.

सांगली जिल्‍ह्यातील कायदा आणि सुव्‍यवस्‍था यांची परिस्‍थिती गंभीर !

सांगली जिल्‍ह्यातील कायदा आणि सुव्‍यवस्‍थेची परिस्‍थिती गंभीर असून त्‍याला उत्तरदायी असलेल्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्‍यांना सादर केले.

सांगलीत ‘रिलायन्स ज्वेल्स’वर भरदुपारी दरोडा

मिरज रस्त्यावरील मार्केट यार्ड परिसराजवळील वसंत कॉलनी येथील ‘रिलायन्स ज्वेल्स शोरूम’वर भरदुपारी १० हून अधिक लोकांच्या टोळीने दरोडा टाकला. यात ‘शोरूम’मधील कर्मचार्‍यांचे हात-पाय बांधून, गोळीबार करून धमकी देत कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

२ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून देण्याच्या आमिषाने तरुणास ६ लाखांचा गंडा !

जनतेचे रक्षण करणार्‍या पोलिसांनीच जनतेला लुटावे, यासारखी लज्जास्पद गोष्ट कोणती  ? असे पोलीस अधिकारी पोलीस विभागाला कलंकच असल्याने सरकारने त्यांना बडतर्फ करून कायद्यानुसार कठोर शिक्षा केली पाहिजे !

संत बाळूमामा मंदिर येथे प्रतिदिन बालसंस्‍कार वर्गाच्‍या माध्‍यमातून मुलांवर संस्‍कार !

वानलेसवाडी, विजयनगर परिसरात गेल्‍या १४ वर्षांपासून कार्यरत असलेल्‍या संत बाळूमामा मंदिराच्‍या माध्‍यमातून नि:शुल्‍क अध्‍यात्‍मप्रसाराचे कार्य चालू आहे

विविध संस्‍था, संघटना, लोकप्रतिनिधी यांच्‍याकडून स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या जयंतीच्‍या निमित्ताने सांगली आणि कोल्‍हापूर जिल्‍ह्यांत विविध संस्‍था, संघटना, लोकप्रतिनिधी यांच्‍या वतीने अभिवादन करण्‍यात आले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने २८ मे या दिवशी रक्तदान शिबिर !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने २८ मे या दिवशी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि ‘आम्ही ८६ वेल्फेअर असोसिएशन’च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या १४० व्‍या जयंतीच्‍या निमित्ताने २१ ते २८ मे या कालावधीत ‘विचार जागरण सप्‍ताहा’चे आयोजन !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या १४० व्‍या जयंतीच्‍या निमित्ताने पर्यटन संचालनालय महाराष्‍ट्र शासन आणि विवेक व्‍यासपीठ यांच्‍या वतीने २१ ते २८ मे या कालावधीत सांगली येथे ‘विचार जागरण सप्‍ताहा’चे (वीरभूमी परिक्रमा) आयोजन करण्‍यात आले आहे.

लाच घेतल्‍याप्रकरणी विटा (जिल्‍हा सांगली) नगरपालिकेचे मुख्‍याधिकारी विनायक औंधकर कह्यात !

बांधकामाचा परवाना देण्‍यासाठी २ लाख रुपयांची लाच घेतांना मुख्‍याधिकारी विनायक औंधकर हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या जाळ्‍यात सापडले. केवळ ३ मासांपूर्वी त्‍यांचे विटा नगरपालिकेच्‍या मुख्‍याधिकारीपदी स्‍थानांतर झाले होते.