‘शंभुगर्जना युवा प्रतिष्ठान’च्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साही वातावरणात साजरी !

१४ मे या दिवशी सकाळी ८ वाजता शिवतीर्थावर (मारुति चौक) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली. ही ज्योत शहरातील विविध मार्गांवरून नेऊन अहिल्यादेवी होळकर चौक, बालाजी मील रोड येथे नेण्यात आली.

आजची पत्रकारिता मूळ उद्देशापासून भरकटत चालली आहे ! – सुशील कुलकर्णी

आज अनेक वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या बंद पडत आहेत. विविध माध्यमांची घसरण चालू असतांना समाजमाध्यमे मात्र वाढत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपेक्षित ‘कि घेतले न हे व्रत अंधतेने’ या उक्तीप्रमाणे पत्रकारिता होतांना दिसत नाही.

आद्यपत्रकार देवर्षी नारद जयंतीच्या निमित्ताने ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता’ यावर व्याख्यान !

विश्व संवाद केंद्र आणि ‘सत्यवेध माध्यम समूह’ यांच्या संयुक्त विद्यमाने आद्यपत्रकार देवर्षी नारद जयंतीच्या निमित्ताने पत्रकार आणि वार्ताहर यांच्यासाठी १३ मे या दिवशी सकाळी ११ वाजता विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

सांगलीत ‘नीट’ परीक्षेसाठी विद्यार्थिनींना कपडे आणि अंतर्वस्त्रे उलटी घालून परीक्षा देण्यास भाग पाडले !

जिल्हा प्रशासनाने झालेल्या प्रकाराचे अन्वेषण करून यात जे कुणी दोषी असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात २ सहस्र ८९० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई !

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात ८८ लाख रुपयांची रोख रक्कम, मद्य, रसायन, गांजा असा ४ कोटी ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नदी स्वच्छ, प्रदूषणमुक्त करण्यासाठी दूषित पाणी नदीमध्ये जाऊ न देणे आवश्यक ! – डॉ. सुरेश खाडे, पालकमंत्री, सांगली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘चला जाणूया नदीला’ या अभियानांतर्गत कृष्णा नदीच्या तीरावर झालेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

शिराळा (जिल्हा सांगली) शहरातील युवतींसाठी विनामूल्य ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या खेळाचे आयोजन !

‘तुम्ही आमच्या घरच्या लक्ष्मी आहात आणि लक्ष्मीसारखे सदैव रहावे’, यांसाठी शिराळा शहरातील १८ ते २५ वर्षांच्या युवतींसाठी श्री. अनिल चव्हाण (अण्णा) आणि शिव नंदन बेकरी-स्वीट्स यांच्या वतीने ईश्वरपूर येथील ‘श्री माणकेश्वर चित्रपटगृह’ (बाल्कनी) येथे ७ ते २० मे या कालावधीत ‘द केरल स्टोरी’च्या चित्रपटाच्या विनामूल्य खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने महिलांसाठी ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे आयोजन !

द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून महिलांना वस्तूस्थिती समजावी, तसेच या चित्रपटास होणार्‍या विरोधास प्रत्युत्तर म्हणून ६ मे या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने महिलांसाठी विजयनगर येथील ‘ऑरम’ चित्रपटगृहात ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते.

खासगी ट्रॅव्हल्स आणि खासगी गाडी यांच्‍या अपघातात चौघे ठार !

विटा-सातारा रस्‍त्‍यावर नेवरी गावाजवळ खासगी ट्रॅव्हल्स आणि खासगी गाडी यांचा ४ मे या दिवशी सकाळी ७ वाजता समोरासमोर अपघात होऊन एकाच कुटुंबातील चारजण ठार झाले आहेत.

शामरावनगर (सांगली) परिसरातील दफनभूमीसाठी आरक्षित भूमीच्‍या भूसंपादन प्रक्रियेचे अन्‍वेषण करा !

सांगली येथील शामरावनगर परिसरातील मुसलमान आणि ख्रिस्‍ती दफनभूमीसाठी आरक्षित भूमीच्‍या भूसंपादक प्रक्रियेचे अन्‍वेषण करून त्‍याचा अहवाल सादर करावा, असे पत्र महाराष्‍ट्र शासनाचे अवर सचिव प्रणव कर्पे यांनी नगररचना संचालक आणि सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्‍त यांना पाठवले आहे.