सांगलीत ‘रिलायन्स ज्वेल्स’वर भरदुपारी दरोडा

कोट्यवधी रुपयांचे दागिने चोरीस

सांगली – येथील मिरज रस्त्यावरील मार्केट यार्ड परिसराजवळील वसंत कॉलनी येथील ‘रिलायन्स ज्वेल्स शोरूम’वर भरदुपारी १० हून अधिक लोकांच्या टोळीने दरोडा टाकला. यात ‘शोरूम’मधील कर्मचार्‍यांचे हात-पाय बांधून, गोळीबार करून धमकी देत कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. यात दरोडेखोर पळून जातांना एक ग्राहक घायाळ झाला. घटनास्थळी पोलीस उपस्थित झाले असून पोलिसांनी ‘सी.सी.टी.व्ही. चित्रणा’च्या साहाय्याने अन्वेषण चालू केले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

संपादकीय भूमिका 

कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !