साधकांनो, ‘दैनिक ‘सनातन प्रभात’साठी लिखाण देणे, ही समष्टी साधना आहे’, हे लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण लिखाण थोडक्यात पाठवा !
‘साधकांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता लिखाण पाठवले, तर त्यातून त्यांची साधना होणार आहे’, हा विचार करून यापुढेही नाविन्यपूर्ण सूत्रे लिहून पाठवावीत. ‘आपले महत्त्वाचे लिखाण आवश्यक त्या माध्यमांतून, उदा. सनातन प्रभात, संकेतस्थळ, ग्रंथ आदींतून योग्य त्या वेळी प्रसिद्ध होणारच आहे’, हे लक्षात घेऊन साधकांनी यासाठी नित्य कृतज्ञ रहावे !’