नागपूर, अमरावती आणि मराठवाडा विभागांत ३ वर्षांत ७ सहस्र ९२ शेतकर्‍यांच्या आत्महत्या !

नागपूर विभागात ९५७, अमरावती विभागात ३ सहस्र ४५२, तर मराठवाडा विभागात २ सहस्र ६८३ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशी माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाकडून विधानसभेत देण्यात आली.

#Exclusive : ‘एन्.डी.आर्.एफ्.’चे केंद्र राज्याबाहेर जाऊ न देता कोकणातच रहाणार !

‘‘रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग हा सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांत आपत्तीचा फटका बसतो. विशेषत: दरडप्रवण क्षेत्रात दुर्घटना घडतात. त्यामुळे ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण पथका’चे पथक रायगड येथेच स्थापन व्हावे, यासाठी राज्यशासन या प्रकरणात लक्ष घालेल.’’

राज्यशासन ‘शिक्षणाचा हक्क’ कायद्यामध्ये सुधारणा करणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

राज्यात शिक्षणाचा हक्क कायद्यामध्ये कर्नाटकच्या पार्श्वभूमीवर सुधारणा करण्यात येणार आहे. शासन नवीन संकल्पेवर दर्जेदार शिक्षण  मिळतील, अशा शाळांची निर्मिती करणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तारांकित प्रश्नावर उत्तर देतांना २१ जुलै या दिवशी विधानसभेत दिली.

#Exclusive : वारंवार दुर्घटना घडूनही कोकणात ‘एन्.डी.आर्.एफ्.’ला मान्यता नाही !

कोकणात ‘आपत्ती प्रतिसाद दल’ कधी स्थापन होणार ?

रोजगार हमी योजनेतील विहिरींचा निधी केवळ सत्ताधार्‍यांच्या मतदारसंघात ! – विरोधकांचा विधानसभेत आरोप

‘रोजगार हमी योजने’च्या अंतर्गत करण्यात आलेल्या विहिरीच्या कुशल आणि अकुशल कामगारांचे वेतन राज्यात मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. यामध्ये निधीवाटपामध्ये भेदभाव केला जात आहे. विरोधकांच्या मतदारसंघात निधी दिला जात नाही.

पावसाळी अधिवेशनात बोगस बियाणाच्या विरोधात कायदा आणला जाईल ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री

राज्यात बोगस बियाण्यांची विक्री होत असल्याची स्वीकृती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली; मात्र या विरोधात कारवाईसाठी वर्ष १९६६ चा कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार बोगस बियाण्यांची विक्री करणार्‍यांना केवळ ५०० रुपयांचाच दंड आहे.

महाराष्ट्र लंपी रोगावरील लस देशाला पुरवणार ! – राधाकृष्ण विखे पाटील, पशूसंवर्धन मंत्री

लंपी रोगावरील लस सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्रशासनासमवेत सामंजस्य करार केला आहे. ही लस सिद्ध करण्यासाठी पुणे येथे एका प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली आहे.

#Exclusive : रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान ‘ड्रग्ज’चा पैसा हिंदूविरोधी आणि अतिरेकी कारवायांसाठी वापरतात !

रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुंबईमध्ये एका घरात ४० ते ५० जण रहातात. या लोकांना राज्यातून आणि देशातून बाहेर कसे काढता येईल ?, याविषयी उपाययोजना करावी अशी मागणी मी करत आहे – आमदार नीतेश राणे

#Exclusive: गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई पावसाळ्यानंतर चालू करणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

राज्यातील गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भातील सरकारच्या भूमिकेविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विशेष मुलाखत घेऊन याविषयीचे धोरण जाणून घेतले.

Exclusive: ‘भ्रष्टाचारी’ म्हणून पकडलेले ९४ टक्के आरोपी सुटतात, तर ८५ टक्क्यांहून अधिक पुन्हा शासकीय सेवेत रूजू होतात !

लोकहो, भ्रष्टाचार का थांबत नाही ? हे लक्षात घ्या ! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून धाड पडल्यास ‘एका भ्रष्टाचार्‍याला शिक्षा झाली’, असा राष्ट्रप्रेमी नागरिकांचा समज होत असेल, तर या वृत्तावरून हा अपसमज दूर होईल !