रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर केरळ येथील सुश्री (कु.) रश्‍मी परमेश्‍वरन् (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के) यांना आलेल्‍या अनुभूती !

‘रामनाथी आश्रमातील श्री गणेशाच्‍या मूर्तीकडे पाहून ‘तेथे साक्षात् श्री गणेश बसला आहे’, असे मला वाटले.

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’ला उपस्‍थित हिंदुत्‍वनिष्‍ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट !

‘रामनाथी आश्रम पहातांना मला ‘मी भगवंताच्‍या दारी आलो आहे’, असे वाटले. माझे मन शुद्ध आणि प्रसन्‍न झाले.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

आश्रमाच्‍या आत प्रवेश करतांना ‘तीर्थ अंगावर शिंपडून पवित्र होणे’, ही कृतीही मला पुष्‍कळ आनंद देऊन गेली.’

सप्‍तर्षींच्‍या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या शुभहस्‍ते धर्मध्‍वजाचे पूजन !

पूजन झाल्‍यानंतर सूर्यकिरणांमुळे वातावरणात केशरी रंग पसरला होता. पूजन होईपर्यंत वातावरण निरभ्र होते आणि पूजन झाल्‍यानंतर काही वेळातच आकाशात सूर्य असतांनाच पाऊस पडला.

ज्ञानमार्गी संत पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांच्या वाणीतील चैतन्यामुळे वाईट शक्तीवर परिणाम होऊन ती नष्ट होणे

‘२९.५.२०२२ या दिवशी ‘ज्ञानमार्गी संतांच्या वाणीतील चैतन्याचा वाईट शक्तींवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांच्या मार्गदर्शनाचा प्रयोग घेण्यात आला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिलेल्या जिज्ञासूंचा अभिप्राय !       

‘रामनाथी आश्रमातील साधक शिस्तीचे पालन काटेकोरपणे करतात. आश्रमात प्रत्येक लहान लहान गोष्टीचे योग्य नियोजन करण्यात येते. आश्रमातील स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे. ‘येथील साधकांचे कौतुक करावे’, असे वाटते.’

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील श्री भवानीदेवीच्‍या मंदिरात देवीच्‍या पादुकांची प्रतिष्‍ठापना !

सप्‍तर्षींच्‍या आज्ञेनुसार येथील सनातनच्‍या आश्रमात १२ मे २०२३ या दिवशी श्री भवानीदेवीच्‍या मंदिरात देवीच्‍या पादुकांची प्रतिष्‍ठापना भावपूर्ण वातावरणात करण्‍यात आली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेज पाहून संत तुकाराम महाराज यांच्या ‘राजस सुकुमार…’ या अभंगाची प्रचीती मिळते ! – सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित डॉ. केशव गिंडे

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या गौरवास्पद कार्याविषयी आणि त्यांच्या सहवासात आलेल्या आध्यात्मिक अनुभवांविषयी पू. पंडित डॉ. केशव गिंडे संतवचनांतून सांगत आहेत . . .

राष्ट्राला सुखी आणि प्रगत करण्याचे व्रत घेतलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

गोव्यातील सनातन संस्थेच्या आश्रमात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आढळतो. येथे अत्यंत पद्धतशीरपणे विविध सेवांची विभागणी केलेली आढळून येते. त्यामुळे सर्वच सेवा अल्प वेळेत आणि उच्च प्रतीच्या होतात.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय

‘अविश्वसनीय ! अवर्णनीय ! अद्भुत ! सनातनच्या रामनाथी आश्रमाचे शब्दांमध्ये वर्णन करणे अत्यंत कठीण आहे. येथे सगळीकडे चैतन्यच चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे जाणवते. प्रत्येक ठिकाणी गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) अस्तित्व अनुभवायला मिळते. भूलोकावर असे दुसरे ठिकाणच नाही. हा आश्रम पाहून मी धन्य धन्य झाले. कृतज्ञता !