ज्ञानमार्गी संत पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांच्या वाणीतील चैतन्यामुळे वाईट शक्तीवर परिणाम होऊन ती नष्ट होणे

‘२९.५.२०२२ या दिवशी ‘ज्ञानमार्गी संतांच्या वाणीतील चैतन्याचा वाईट शक्तींवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांच्या मार्गदर्शनाचा प्रयोग घेण्यात आला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांची जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

पू. डॉ. शिवकुमार ओझा

१ अ. ज्ञानी असून अल्प अहं असणारे आणि आनंदी दिसणारे पू. (डॉ.) शिवकुमार ओझा ! : पू. ओझा यांच्याकडे पाहिल्यावर ‘त्यांना सर्व विषयांचे ज्ञान असूनही त्यांना त्याचा अहं नाही’, असे मला वाटले. बहुतेक वेळा ज्ञानी असणार्‍या लोकांमध्ये अहंभाव असल्यामुळे त्यांचा चेहरा रागीट दिसतो; परंतु पू. (डॉ.) ओझा यांच्यामध्ये प्रेमभाव जाणवतो. त्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळेच आनंदाचे वलय आहे.

१ आ. ज्ञान, भक्ती आणि कर्म या तिन्ही मार्गांनी साधना करणारे पू. (डॉ.) शिवकुमार ओझा ! : पू. ओझा यांची लहानपणापासून ज्ञानयोगानुसार साधना चालू असून सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर त्यांची भक्तीयोगानुसार साधना चालू झाली. ‘त्यांनी प्रत्येक कर्माला ज्ञान आणि भक्ती यांची जोड दिल्यामुळे त्यांची कर्मयोगानुसारही साधना चालू आहे’, असे मला वाटले.

२. पू. (डॉ.) ओझा यांनी देवनागरी लिपीतील बाराखडीच्या उच्चारांच्या विशिष्ट क्रमाविषयी केलेले मार्गदर्शन !

सुश्री (कु.) कल्याणी गांगण

पू. (डॉ.) ओझा म्हणाले, ‘‘देवनागरी लिपीची ‘क, ख, ग, घ, च, छ, ज, झ …’ ही बाराखडी असून त्याची निर्मिती भगवंताने केली आहे. त्यातील प्रत्येक अक्षराचा उच्चार विशिष्ट क्रमानुसार होतो, उदा. ‘क’चा उच्चार विशुद्ध चक्रातून, ‘ख’चा उच्चार गळ्याचा शेवट आणि चेहर्‍याचा आरंभ यांच्या मधल्या भागातून होतो. ‘ग’चा उच्चार जिभेच्या खालील भागातून, ‘घ’चा उच्चार जिभेने आणि ‘च’चा उच्चार जिभेच्या शेंड्याच्या भागातून होतो. भगवंताने या सर्व शब्दांच्या उच्चारांचा क्रम संस्कृत भाषेनुसार लावला आहे. त्यामुळे मराठी भाषेतून बोलल्यावर चैतन्य मिळून त्याचा मानवी शरिरावर आध्यात्मिक द्ृष्टीने चांगला परिणाम होतो; याउलट विदेशी भाषेतील ‘ए, बी, सी, डी’, या शब्दांच्या उच्चारांचा विशिष्ट क्रम नाही.’’

३. पू. (डॉ.) ओझा यांच्या वाणीतील चैतन्यामुळे वाईट शक्तीने निर्माण केलेले आवरण नष्ट होणे

पू. ओझा यांच्या बोलण्यातील चैतन्यामुळे माझ्यावर असलेले वाईट शक्तीचे आवरण नष्ट झाले. वाईट शक्तीने माझ्याभोवती आवरणाची ३ कवचे निर्माण केली होती. ती नष्ट झाली.

४. अनाहतचक्राच्या ठिकाणी वाईट शक्ती दिसून ती नष्ट होतांना दिसणे आणि त्यानंतर हलकेपणा जाणवणे

काही वेळानंतर मला माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी वाईट शक्तीचा चेहरा दिसू लागला आणि हळूहळू तो नष्ट झाला. तेव्हा ‘माझ्या मनातील सर्व विचार नष्ट होत आहेत’, असे जाणवून मला हलके वाटले.’

– सुश्री (कु.) कल्याणी गांगण (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.५.२०२२)

•   वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

•   या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक