सरदार पटेल यांनी भारताला एकत्रित केल्याचे श्रेय आदि शंकराचार्य यांना जाते ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

त्यांनी १ सहस्र वर्षांच्या पूर्वी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकतेविषयी भारतियांना जागृत केले, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी केले.

उच्च पातळीच्या संतांनी समाधी घेण्याचे कारण आणि त्यांनी समाधी घेतल्यानंतरही चैतन्याच्या माध्यमातून त्यांचे कार्य अविरत चालू रहाणे

‘जेव्हा संतांना या भूतलावर आता अधिक करण्यासारखे किंवा मिळवण्यासारखे काही उरलेले नाही, याची जाणीव होऊ लागते, त्यामुळे ते समाधी घेतात.’

प्रभु श्रीरामांकडून प्रेरणा घेत समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्याचे काम करावे ! – प.पू.सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

प्रभु श्रीराम यांनी नेहमीच सामाजिक एकतेचा मार्ग अंगीकारला. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्यासाठी प्रयत्न केले. आपण त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी.

पू. पद्माकर होनप यांच्या देहत्यागाच्या संदर्भात प.पू.देवबाबा यांनी केलेले मार्गदर्शन !

मी किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांना म्हणालो, ‘‘देहत्यागानंतर २ – ३ सेकंदांतच बाबांचा लिंगदेह उच्च लोकात स्थिर झाला आहे’, असे मला जाणवले.’’ त्यावर प.पू. देवबाबा म्हणाले, ‘‘बरोबर आहे. बाबांना पुनर्जन्म नाही. ते वैकुंठलोकात गेले आहेत.

पू. नंदा आचारी गुरुजी यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्री. नंदा आचारी गुरुजी यांचे संतपद घोषित केल्यावर त्यांच्या नयनांतून अश्रुधारा वाहू लागल्या. तेव्हा त्यांच्या चित्तातील भक्ती आणि आनंद भावाश्रूंच्या रूपाने व्यक्त झाल्याचे जाणवले. त्यामुळे कार्यक्रमस्थळाचे वातावरण पुष्कळ भावमय आणि आनंददायी झाले.

सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) यांचा देहत्याग

अफाट सहनशीलता आणि देवावरील दृढ श्रद्धा यांमुळे गंभीर आजारपणाला स्थिरतेने सामोरे जाणारे सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) !

नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील ज्ञानयोगी संत प.पू. काणे महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील थोर संत प.पू. काणे महाराज यांचा पाचवा पुण्यतिथी उत्सव २८ ऑक्टोबर २०२२ या दिवशी मनोहरबाग, नारायणगाव येथे भावपूर्ण वातावरणात साजरा झाला.

प.पू. काणे महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम नारायणगाव (पुणे) येथे भावपूर्ण वातावरणात पार पडला !

प.पू. काणे महाराज यांच्या पादुकांचे पूजन त्यांचे भक्त श्री. गणेश भुसारी आणि सौ. मनीषा भुसारी यांनी केले.

प.पू. दास महाराजांना भेटण्याची इच्छा असतांना दासनवमीच्या दिवशी त्यांना भेटण्याची संधी मिळणे

२३.२.२०२२ या दिवशी प.पू. दास महाराजांचा वाढदिवस होता. त्यापूर्वी मला ‘प.पू. दास महाराज यांना भेटावे’, असे वाटत होते; परंतु काही कारणास्तव मला त्यांच्याकडे जाता येत नव्हते. तेव्हा मी हनुमंतरायांना प्रार्थना केली…

‘एकाच कुटुंबातील ३ संतांच्या हस्ताक्षरांना एकाच वेळी दैवी गंध येणे’, ही अध्यात्माच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय घटना !

‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात २०.८.२०१३ या दिवशी एक अद्वितीय घटना घडली. प.पू. डॉक्टर खोलीत रात्री १० वाजता संगणकावर ग्रंथांच्या धारिका पडताळत होते. त्या वेळी तेथे दैवी गंध तीव्रतेने दरवळू लागला. तेथे असणार्‍या सर्व साधकांनाही तो जाणवला.