रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

काल वैशाख शुक्ल तृतीया (३.५.२०२२) या दिवशी सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेर यांचा ९० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांची मुलगी आणि सून यांनी वर्णन केलेला त्यांचा साधनाप्रवास येथे दिला आहे.

अयोध्येतील तपस्वी छावणीचे जगद्गुरु परमहंसाचार्य यांना ताजमहालमध्ये जाण्यास रोखले !

हिंदूंच्या संतांचा असा अवमान केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणार्‍या सुरक्षा यंत्रणा कशा काय करतात ? त्यांना संतांचा योग्य मान राखण्याचे शिकवलेले नाही का ?

अलवर येथे शिवमंदिर पाडल्याच्या विरोधात भाजपच्या मोर्च्यात साधू आणि संत यांचा सहभाग !

अलवर येथील राजगडमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ३०० वर्षे जुने शिवमंदिर आणि अन्य २ मंदिरे पाडल्याच्या विरोधात भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर साधू-संतांच्या सहभागासह ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.

एरंडोळ (जिल्हा कोल्हापूर) येथील रामायणाचार्य ह.भ.प. तुळशीराम महाराज पोखरकर यांचा देहत्याग !

रामायणाचार्य ह.भ.प. तुळशीराम महाराज पोखरकर आणि सनातन संस्था यांचे स्नेहाचे संबंध होते. महाराजांनी सनातन संस्थेच्या रामनाथी, फोंडा, गोवा येथील आश्रमास भेट दिली होती. ‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले हे साक्षात ‘श्रीकृष्ण’ आहेत’, असाच त्यांचा भाव होता.

प्रत्येकाने दिवसातील १५ मिनिटे वेळ काढून राष्ट्र-धर्माच्या स्थितीविषयी चिंतन-मनन केले पाहिजे ! – शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वतीजी महाराज, काशी सुमेरू पीठ

भारताने नेहमीच विश्वकल्याणाची भूमिका घेतली आहे. तमिळी हिंदूंची हत्या करणार्‍या श्रीलंकेत खाण्यासाठी अन्न नाही, अशी स्थिती आहे. भारताचा तिरस्कार करणार्‍या पाकिस्तानची स्थिती काय आहे, हे आपण पहात आहोत.