प्रभु श्रीरामांकडून प्रेरणा घेत समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्याचे काम करावे ! – प.पू.सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

प.पू.सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

बक्सर (बिहार) – प्रभु श्रीराम यांनी नेहमीच सामाजिक एकतेचा मार्ग अंगीकारला. श्रीराम यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारताला एकत्र ठेवण्याचे काम केले. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्यासाठी प्रयत्न केले. आपण त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी. सामाजिक ऐक्यासाठी आपण काम केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

ते येथील अहिरौली गावत साधूंच्या परिषदेला संबोधित करत होते.

अहिरौली येथे एकूण ९ दिवसांच्या ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र महाकुंभ’ या धार्मिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला भाजपाशासित राज्यांमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच काही राज्यांचे राज्यपाल उपस्थित रहाण्याची शक्यता आहे.


प.पू.सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे संपूर्ण वक्तव्य 

 (सौजन्य : RSS Swayamsevak (facebook page))