पू. पद्माकर होनप यांच्या देहत्यागाच्या संदर्भात प.पू.देवबाबा यांनी केलेले मार्गदर्शन !

पू. पद्माकर होनप

‘३०.१०.२०२२ या दिवशी पू. पद्माकर होनप यांनी देहत्याग केला. २.११.२०२२ या दिवशी मी प.पू. देवबाबा यांना भ्रमणभाष करून बाबांच्या देहत्यागाचे वृत्त सांगितले. त्या वेळी मी किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांना म्हणालो, ‘‘देहत्यागानंतर २ – ३ सेकंदांतच बाबांचा लिंगदेह उच्च लोकात स्थिर झाला आहे’, असे मला जाणवले.’’ त्यावर प.पू. देवबाबा म्हणाले, ‘‘बरोबर आहे. बाबांना पुनर्जन्म नाही. ते वैकुंठलोकात गेले आहेत.’’

– श्री. राम होनप ((कै.) पू. पद्माकर होनप यांचा धाकटा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.११.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक