सरदार पटेल यांनी भारताला एकत्रित केल्याचे श्रेय आदि शंकराचार्य यांना जाते ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

थिरूवनंतपूरम् (केरळ) – सरदार पटेल यांनी वर्ष १९४७ मध्ये संस्थानांचे विलीनीकरण करून भारताला एकजूट केले. यामुळे भारत सर्वांत मोठा लोकशाहीप्रधान देश बनू शकला. याचे खरे श्रेय केरळचे सुपुत्र असलेल्या आदि शंकराचार्य यांना जाते. त्यांनी १ सहस्र वर्षांच्या पूर्वी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकतेविषयी भारतियांना जागृत केले, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीला केले.

आदि शंकराचार्य यांचा जन्म केरळच्या कलाडी गावात झाला होता.