‘धर्मप्रेमींची साधना आणि सेवा चांगली व्हावी’, यासाठी प्रयत्नरत असणारे जळगाव येथील श्री. प्रशांत जुवेकर (वय ३९ वर्षे) !

१२.४.२०२५ (चैत्र पौर्णिमा) या दिवशी जळगाव येथील श्री. प्रशांत जुवेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी सौ. क्षिप्रा जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि साधक श्री. गजानन तांबट यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. 

(श्री. प्रशांत यांचे वडील श्री. हेमंत जुवेकर (वय ६८ वर्षे) हे उज्जैन (मध्यप्रदेश) येथे आणि आई सौ. प्राची जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६१ वर्षे) या वाराणसी आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहेत.)

श्री. प्रशांत जुवेकर

श्री. प्रशांत जुवेकर यांना ३९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर (श्री. प्रशांत यांची पत्नी, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), जळगाव

१ अ. मनमोकळेपणामुळे सर्वांशी जवळीक साधणे 

१. ‘श्री. प्रशांत यांची सर्व वयोगटातील व्यक्तींशी मैत्री होते. आम्ही अयोध्या येथे असतांना ७० वर्षे वयाच्या एक प्रतिष्ठित व्यक्तींना भेटलो होतो. ते पुष्कळ श्रीमंत असून त्यांचा बर्‍याच देशांमध्ये व्यापार चालू आहे. पहिल्या भेटीतच त्यांची श्री. प्रशांत यांच्याशी एवढी जवळीक झाली की, त्यांनी त्यांची वैयक्तिक अडचण श्री. प्रशांत यांना मनमोकळेपणाने सांगितली. आताही ते श्री. प्रशांत यांना भ्रमणभाष करतात.

सौ. क्षिप्रा जुवेकर

२. एका मंदिराच्या विश्वस्तांनी प्रशांत यांना स्वतःच्या अतिशय गंभीर आजाराविषयी सांगितले. त्याविषयी त्यांनी कुणालाही सांगितले नव्हते.

३. प्रशांत यांची जळगावमध्ये मोठ्या प्रशासकीय अधिकार्‍यांशी सेवेनिमित्त भेटी होतात. त्यांतील काही अधिकारी निवृत्त झाले आहेत, तसेच काही जणांचे स्थानांतर झाले आहे, तरीही ते प्रशांत यांना भ्रमणभाष करून शुभेच्छा देतात. ३ वर्षांपूर्वी प्रशांत यांच्या हृदयाचे शस्त्रकर्म नाशिक येथे झाले. तेव्हा जळगाव येथील आमदारांनी प्रशांत यांची भ्रमणभाषवरून विचारपूस केली. जळगाव येथील जिल्हाधिकार्‍यांनी नाशिक येथील त्यांच्या ओळखीच्या अधिकार्‍याला प्रशांत यांच्या साहाय्यासाठी रुग्णालयात पाठवले होते.

१ आ. धर्मप्रेमींची साधना आणि सेवा चांगली होण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवणे : प्रशांत ‘धर्मप्रेमींची साधना आणि सेवा व्हावी’, यासाठी सतत चिंतन करत असतात. त्यामुळे त्यांना नवीन संकल्पना सुचतात आणि त्या कृतीत आणल्यावर गुरुकृपेने चांगला प्रतिसाद मिळतो. जानेवारी २०२५ मध्ये प्रशांत यांनी प्रतिमास एका मंदिरात ‘सामूहिक महाआरती, हनुमानचालिसा पठण, ‘हिंदु राष्ट्रा’साठी शपथ घेणे आणि प्रबोधन करणे’, असे नियोजन केले. त्या मंदिरात आतापर्यंत ३ महाआरत्या झाल्या आहेत. प्रत्येक महाआरतीमध्ये ६०० हून अधिक धर्मप्रेमी सहभागी झाले होते. फेब्रुवारी आणि मार्च २०२५ मध्ये धर्मप्रेमी अन् हिंदुत्वनिष्ठ यांनी महाआरतीच्या वेळी सर्व सेवा केल्या. त्यामुळे त्यांना सेवेचा आनंद घेता आला. हे धर्मप्रेमी अन्य कार्यक्रमांतही पुढाकार घेऊन तळमळीने सेवा करत आहेत.

१ इ. सनातनच्या तिन्ही गुरूंप्रती भाव : मागील वर्षभरात प्रशांत यांच्या जीवनात अस्थिरता निर्माण करणारे अनेक कठीण प्रसंग घडले; मात्र ते श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनामुळे स्थिर राहू शकले. सध्या त्यांनी सांगितलेले दृष्टीकोन लक्षात ठेवून प्रशांत कोणत्याही प्रसंगांना सामोरे जातात आणि त्रासांवर मात करतात. त्यांच्या मनात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे.

मी प्रशांत यांच्यामुळेच साधनेत टिकून आहे. ‘ते मला यजमान म्हणून लाभले’, त्याबद्दल मी गुरुचरणी ऋणी आहे. ‘त्यांची शीघ्र आध्यात्मिक प्रगती होवो’, अशी मी सनातनच्या तिन्ही गुरूंच्या चरणी प्रार्थना करते.’

२. श्री. गजानन तांबट, जळगाव

२ अ. उत्तम स्मरणशक्ती : ‘श्री. प्रशांतदादांचा जळगाव आणि आसपासच्या गावांमध्ये बर्‍याच जणांशी सेवेच्या निमित्ताने संपर्क येतो. पूर्वी भेटलेली एखादी व्यक्ती २ – ३ वर्षांनी पुन्हा भेटली, तरी दादांना त्यांचे नाव आणि अन्य माहिती लगेच आठवते. एखाद्याचा भ्रमणभाष आला, तर दादा भ्रमणभाष करणार्‍या व्यक्तीला तिच्या आवाजावरून ओळखतात.

श्री. गजानन देवीदास तांबट

२ आ. साधकांना प्रेमाने सेवेसाठी प्रोत्साहन देणे : दादा संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचा सखोल अभ्यास करतात. ते सहसाधकांना सेवेचे दायित्व देऊन त्यांना प्रोत्साहित करतात. ते सेवा करणार्‍या साधकांशी अत्यंत प्रेमाने बोलतात. त्यामुळे त्यांचे बोलणे साधकांच्या हृदयापर्यंत पोचते.

२ इ. आध्यात्मिक मित्र : वर्ष २००९ पासून माझा प्रशांतदादांशी संपर्क आहे. मी दादांना माझी प्रत्येक अडचण मनमोकळेपणाने सांगतो. ते मला आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करतात. ते प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहून मला धीर देतात.

२ ई. सेवेची तळमळ  

१. एकदा प्रशांतदादांच्या हृदयाचे शस्त्रकर्म झाले होते. आधुनिक वैद्यांनी त्यांना २ – ३ मास विश्रांती घेण्यास सांगितले होते. शस्त्रकर्म झाल्यावर २५ दिवसांनी जळगावमध्ये एका शिबिराचे आयोजन केले होते. तेव्हा दादांनी शिबिर आणि अन्य सेवा यांमध्ये सहभाग घेतला.

२. ‘हृदयाचे शस्त्रकर्म झाल्यावर सर्वसाधारणपणे सामान्य माणसाचे आयुष्य न्यून होते’, असे मी ऐकले होते. याविषयी मी प्रशांतदादांना विचारले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘आपण किती दिवस जगलो ?’, याला महत्त्व नाही; पण ‘आपण कसे जगलो आणि गुरुकार्य करत जगलो’, याला अधिक महत्त्व आहे. आता या शस्त्रकर्मामुळे जर माझे आयुष्य न्यून झाले असेल, तर मला अधिक सेवा कराव्या लागतील. मला ‘हिंदु राष्ट्रा’च्या कार्यात झोकून देऊन प्रयत्न करावे लागतील.’’

२ उ. हिंदुत्वनिष्ठ संघटनांना आधार वाटणे : जळगाव शहरामध्ये हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्रित येऊन पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देतात. तेव्हा दादा पुढाकार घेऊन नियोजन करतात आणि निवेदन देतांना संबंधितांशी अभ्यासपूर्ण चर्चा करतात. त्यामुळे संघटनांना प्रशांतदादांचा आधार वाटतो.

२ ऊ. गुरूंप्रती भाव : ज्याप्रमाणे हनुमंताचा श्रीरामाप्रती भाव होता, तसाच दादांचा गुरुदेवांप्रती भाव आहे. ‘सर्व सेवा प.पू. गुरुदेवच करून घेतात’, असा दादांचा भाव असतो.

प्रशांतदादांमध्ये ‘समयसूचकता, तीक्ष्ण बुद्धी, चतुराई, सावधानता, चिंतन करणे, प्रेमभाव, ब्राह्मतेज, क्षात्रतेज, मनमोकळेपणा’ इत्यादी गुण आहेत. ‘गुरुदेवांनी मला त्यांच्यासारखा आध्यात्मिक मित्र दिला’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : ६.४.२०२५)