ब्रिटनने कोट्यवधी भारतियांना ठार मारून ४५ ट्रिलियन डॉलर्सची संपत्ती लुटून नेली !

भारतावर राज्य करतांना ब्रिटनने ४५ ट्रिलियन डॉलर्सची साधनसंपत्ती भारतातून लुटून नेली. त्या बळावर ब्रिटन श्रीमंत बनले.

शिधा आणि शस्त्रे यांच्याविना उणे २५ डिग्री तापमानात लढणे अशक्य !

रशियाच्या सैनिकांची पुतिन यांना व्हिडिओद्वारे विनंती !

रशियाने युक्रेनसमवेतचे युद्ध जिंकण्यासाठी सैन्यदलप्रमुख पालटला !

या युद्धामध्ये रशियाची हानी होत असल्याने आणि रशियाने युक्रेनचे जिंकलेले प्रदेश तो रशियाकडून पुन्हा मिळवत असल्याने हा पालट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

रशियाच्या शस्त्रसाठ्यामध्ये ७५ टक्के घट झाल्याने आक्रमणाची धार बोथट ! – अमेरिकेचा दावा

अमेरिकेचे म्हणणे आहे की, रशियाने आतापर्यंत क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला होता; मात्र आता शस्त्रसाठ्यामध्ये घट होऊ लागल्याने तो जुनी शस्त्रे वापरत आहे.

मॉस्को-गोवा विमानात बाँबची अफवा !

‘गोवा एअर ट्रॅफिक कंट्रोल’ला ‘ई मेल’द्वारे विमानात बाँब असल्याची माहिती देण्यात आली होती; मात्र हा ‘ई मेल’ कुणी आणि का पाठवला ? हे अद्याप कळू शकले नाही.

अण्वस्त्रांच्या वापराविषयी पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी व्यक्त केलेल्या चिंतेचा रशियावर परिणाम !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अणूबाँबच्या वापराच्या संदर्भात व्यक्त केलेल्या चिंतेचा परिणाम रशियावर झाला आहे, असा दावा अमेरिकेची गुप्तचर संस्था सी.आय.ए.चे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी केला.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला रशियाचा पुन्हा पाठिंबा !

जागतिक स्तरावर भारत आणि ब्राझिल यांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांचा स्थायी सदस्य म्हणून परिषदेत समावेश करण्याविषयी विचार व्हायला हवा. 

रशियाने कच्च्या तेलावर भारताप्रमाणे ४० टक्के सवलत देण्याची पाकची मागणी फेटाळली

रशियाने, ‘आमचे पुरवठा करण्याचे नियोजन झाले आहे, तसेच आम्ही भारतासारख्या मोठ्या खरेदीदाराला अप्रसन्न करू शकत नाहीत’, असे स्पष्ट केले आहे.

रशियामध्ये ४८ सहस्र वर्षांपूर्वीचा प्राणघातक ‘झोंबी’ विषाणू सापडला !

रशियातील शास्त्रज्ञांची एक तुकडी या प्राणघातक विषाणूचा अभ्यास करत आहे. हवेतून या विषाणूचा प्रसार झाल्यास हा जगासाठी मोठा धोका ठरू शकतो.

अमेरिका भारताला ‘नाटो’मध्ये सहभागी करण्याच्या प्रयत्नात ! – रशियाचा दावा

अमेरिका आणि नाटो यांनी तणाव वाढवल्यामुळे रशियाने चीनसमवेत सैन्य सहयोग अधिक जलद गतीने वाढवला आहे, असेही लावरोव्ह यांनी सांगितले.