अण्वस्त्रांच्या वापराविषयी पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी व्यक्त केलेल्या चिंतेचा रशियावर परिणाम !

अमेरिकेची गुप्तचर संस्था सी.आय.ए.चे प्रमुख विल्यम बर्न्स यांचा दावा !

सी.आय.ए.चे प्रमुख विल्यम बर्न्स

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अणूबाँबच्या वापराच्या संदर्भात व्यक्त केलेल्या चिंतेचा परिणाम रशियावर झाला आहे, असा दावा अमेरिकेची गुप्तचर संस्था सी.आय.ए.चे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी केला.

बर्न्स पुढे म्हणाले की, युक्रेनच्या विरोधात अण्वस्त्रांचा वापर करण्याविषयीच्या रशियाच्या योजनेविषयी आम्हाला स्पष्ट माहिती मिळालेली नाही. रशियाचे राष्ट्रपती पुतिन युक्रेनला घाबरवण्यासाठी युक्रेनशी युद्ध करत आहेत, असेही बर्न्स यांनी सांगितले.