अमेरिका भारताला ‘नाटो’मध्ये सहभागी करण्याच्या प्रयत्नात ! – रशियाचा दावा

(‘नाटो’ म्हणजे ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली सैनिकी संघटना)

डावीकडून रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेइ लावरोव्ह आणि पंतप्रधान नरेद्र मोदी

मॉस्को (रशिया) – दणिक्ष चीन सागर आता तणाव असणारे नवीन क्षेत्र निर्माण झाले आहे. यामागे ‘नाटो’चा हात आहे. नाटोने युक्रेनमध्ये हेच केले. ‘नाटो’ देश विशेषतः अमेरिका आता भारताला रशिया आणि चीन यांच्या विरोधात या गटात सहभागी करू इच्छित आहे, असा आरोप रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेइ लावरोव्ह यांनी केला. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेइ लावरोव्ह

अमेरिका आणि नाटो यांनी तणाव वाढवल्यामुळे रशियाने चीनसमवेत सैन्य सहयोग अधिक जलद गतीने वाढवला आहे, असेही लावरोव्ह यांनी सांगितले.