मॉस्को / इस्लामाबाद – रशियाने पाकिस्तानला ४० टक्के सवलतीमध्ये कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानचे वृत्तपत्र ‘द न्यूज’ने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. रशियाने, ‘आमचे पुरवठा करण्याचे नियोजन झाले आहे, तसेच आम्ही भारतासारख्या मोठ्या खरेदीदाराला अप्रसन्न करू शकत नाहीत’, असे स्पष्ट केले आहे.
रशियाने पाकला दाखवली जागा, कच्च्या तेलावर भारताप्रमाणे ४० टक्के सवलत नाकारली
👉 https://t.co/16xNBD325f
#मराठी #मराठी_बातम्या #Marathi #MarathiNews #Navarashtra— Navarashtra (@navarashtra) December 2, 2022
रशियाकडून सध्या भारताला ४० टक्के सवलतीमध्ये या तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे. भारताला ज्याप्रमाणे सवलत दिली जाते, तशी सवलत आम्हाला मिळावी, यासाठी पाकिस्तानचे शिष्टमंडळ गेल्या २ मासांत दोन वेळा रशियाला गेले होते. त्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान मॉस्कोला गेले होते आणि तेव्हाही त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याकडे पाकिस्तानला स्वस्त तेल देण्याची मागणी केली होती. तेव्हाही पुतिन यांनी ती मागणी फेटाळून लावली होती.