रशियाला शह देण्यासाठी ‘नाटो’ ४ तुकड्या पाठवणार

शिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धास प्रारंभ होऊन एक मास उलटला असून यासंदर्भात एक तातडीची बैठक घेण्यासाठी ‘नाटो’चे (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’चे) सर्व सदस्य देश बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे शिखर संमेलनाच्या निमित्ताने एकत्रित आले आहेत.

रशियन नागरिकांच्या जीवनावश्यक खर्चात १४ टक्क्यांनी वाढ !

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून जगभरातील प्रमुख देशांनी रशियावर अनेक प्रतिबंध लादले आहेत, तसेच रशियाला युद्धावर प्रचंड प्रमाणात खर्चही करावा लागत आहे. त्यामुळे रशियन नागरिकांच्या जीवनावश्यक खर्चात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत युक्रेनविषयीच्या रशियाच्या प्रारूपावरील मतदानात भारत तटस्थ

चीनने या प्रारूपास पाठिंबा दिला. दुसरीकडे इस्रायलने रशियाची भीती दाखवून ‘पेगासस’ हे गुप्तचर ‘सॉप्टवेअर’ युक्रेनला देण्यास नकार दिला आहे.

युक्रेनी सैन्याकडून रशियन सैनिकांना हुसकावून लावण्यास आरंभ ! – अमेरिकेचा दावा

युक्रेनची राजधानी कीवच्या पश्चिमेला असलेल्या मकारिव शहरामध्ये पुन्हा एकदा युक्रेनचा ध्वज फडकावण्यात आला आहे.

रशियाकडून ‘हायपरसोनिक’ क्षेपणास्त्राचा वापर आणि युक्रेनची लढाऊ वृत्ती

हायपरसोनिक क्षेपणास्त्र हे अतिशय अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहे. ते खालच्या पातळीवर उडते आणि त्याची लक्ष्य अचूक साधण्याची शक्यता पुष्कळ अधिक असते.

रशियाने ‘फेसबूक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ यांना ‘आतंकवादी संघटना’ ठरवून घातली बंदी !

ट्विटर आणि फेसबूक यांद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे, तसेच भारतविरोधी विचारांचा प्रसार करणे आदी गोष्टी केल्या जातात. अशा सामाजिक माध्यमांवर भारतात कधी बंदी घातली जाणार ?

जेव्हा रशियाला स्वतःच्या अस्तित्वाचा धोका जाणवेल, तेव्हा अण्वस्त्रांचा वापर होईल ! – रशिया

‘पुतिन आण्विक शस्त्रांचा वापर करणार नाही, यावर पूर्ण विश्‍वास आहे का ?’ असा प्रश्‍न रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वरील उत्तर दिले.

रशियामध्ये साखरेच्या खरेदीवरून होत आहेत भांडणे !

गेल्या २८ दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धाचा युक्रेनच्या नागरिकांवर जसा गंभीर परिणाम झाला आहे, तसा आता रशियाच्याही नागरिकांवर काही प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

पुतिन युक्रेनवर रासायनिक आणि जैविक शस्त्रे यांद्वारे आक्रमण करू शकतात ! – बायडेन

अमेरिका रशियावर अत्यधिक तीव्रतेचे निर्बंध लादत असल्याने रशिया अमेरिकेवर ‘सायबर आक्रमणे’ही करू शकतो, असेही बायडेन म्हणाले.

झेलेंस्की यांच्याकडून पोप फ्रान्सिस यांना युद्धासंदर्भात मध्यस्थी करण्याचे आवाहन !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी जगभरातील ख्रिस्त्यांचे धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांच्याशी रशिया-युक्रेन युद्धाविषयी चर्चा केली. ‘रशियासमवेत चालू असलेल्या युद्धाला पूर्णविराम मिळावा’, यासाठी पोप यांनी मध्यस्थी करावी, असे आवाहनही झेलेंस्की यांनी या वेळी केले.