दुर्गापूर (बंगाल) – मुंबईहून बंगालमधील दुर्गापूरला जाणारे ‘स्पाइसजेट’ या प्रवासी वाहतूक आस्थापनाचे ‘बोइंग बी ७३७’ विमान वादळात अडकले. त्यानंतर विमानातील वरच्या भागात ठेवलेले सामान खाली पडू लागले. त्यामुळे यातील सुमारे ४० प्रवासी घायाळ झाले.
Daily brief: 2 passengers in ICU after SpiceJet’s Mumbai-Durgapur flight turbulence incident, and all the latest news https://t.co/Lc8INv7AA6
— Hindustan Times (@HindustanTimes) May 2, 2022
त्यांपैकी १० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. वैमानिकाच्या कौशल्यामुळे विमान धावपट्टीवर सुखरूप उतरले. घायाळांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.