क्युबाची राजधानी हवानात भीषण स्फोट, २२ ठार !

हवाना (क्युबा) – दक्षिण अमेरिकी देश क्युबाच्या राजधानीत ‘सेराटोगा’ नावाच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ६ मेच्या रात्रीत भीषण स्फोट झाला. ही घटना घडल्यानंतर हॉटेलमधून प्रचंड धुराचे लोट बाहेर निघत होते. सुरक्षा दलांनी हॉटेलला वेढा घातला. या दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे. राष्ट्राध्यक्ष मिगुल डियाझ आणि त्यांचे काही मंत्री यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली.

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या क्युबाला मोठा आर्थिक तोटा होण्याची शक्यता !

‘न्यूयॉर्क पोस्ट’ने त्याच्या वृत्तात म्हटले की, द्रवरूप गॅस टँकरमधून सिलिंडरमध्ये गॅस भरत असतांना हा स्फोट झाला. हा स्फोट क्युबासाठी मोठा आर्थिक तोटा ठरू शकतो. कोरोना महामारीनंतर आता क्युबातील पर्यटन क्षेत्राला वेग आला आहे. अशात हा स्फोट घडल्याने पर्यटकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे येथील अर्थव्यवस्था आधीच वाईट स्थितीतून जात आहे. अशातच येथील सरकारच्या विरोधात अनेक निदर्शने चालू आहेत.