तमिळनाडूमध्ये रथयात्रेच्या वेळी विजेचा धक्का लागल्याने ११ जणांना मृत्यू, तर १५ जण घायाळ

तंजावर (तमिळनाडू) – येथे एका धार्मिक रथयात्रेच्या वेळी झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण घायाळ झाले. ही घटना पहाटे ३ च्या सुमारास घडली. रथयात्रेतील रथाच्या कळसाचा संपर्क उघड्या वीजवाहक तारांशी झाल्याने ही घटना घडली. दुर्घटनेत ७ जणांचा तात्काळ मृत्यू झाला, तर ४ जण उपचाराच्या वेळी दगावले.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के.स्टॅलीन यांनी या दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य घोषित केले.

तसेच पंतप्रधान मोदी यांनीही ‘पंतप्रधान सहाय्यता निधी’मधून मृतांच्या नातेवाइकांना २ लाख रुपये, तर घायाळांना ५० सहस्र रुपयांचे साहाय्य घोषित केले. राज्य सरकारने या दुर्घटनेच्या चौकशीचा आदेश दिला आहे.