Mainpuri Accident : मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथील भीषण अपघातात ४ महिला ठार !

मैनपुरी (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील भोगाव येथे २० एप्रिलला सकाळी झालेल्या भीषण अपघातात ४ महिलांचा मृत्यू झाला, तर २४ जण घायाळ झाले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला ट्रकने धडक दिल्याचे वृत्त आहे.

नामकरण सोहळ्याला उपस्थित राहून परतलेले महिला-पुरुष हे या ट्रॉलीतून प्रवास करत होते. वाटेत हा अपघात झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व घायाळांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती केले.