नगरसेवक अण्णा लेवे यांचे आरोप तथ्यहीन ! – नगराध्यक्षा माधवी कदम

केवळ विहित माहिती दिली नाही म्हणून प्रशासन भ्रष्टाचारात बरबटलेले आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. कोरोना काळातील खरेदीविषयीची माहिती एक नगरसेवक किंवा विश्‍वस्त म्हणून अण्णा लेवे यांनी घेणे महत्त्वाचे होते.

सामाजिक संकेतस्थळावर छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

राज्यात महिलांची सुरक्षा धोक्यात ! आपल्या मुली अत्याचाराला बळी पडू नयेत, यासाठी त्यांना वेळीच स्वरक्षण प्रशिक्षण द्या !

सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी २ वैद्यकीय अधिकारी निलंबित

पोलिओ डोसाच्या ऐवजी बालकांना सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या चौकशीनंतर डॉ. भूषण मेश्राम आणि डॉ. महेश मनवर या वैद्यकीय अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले.

शाहू कलामंदिर येत्या १५ दिवसांत चालू करणार ! – खासदार उदयनराजे भोसले

सातारावासीय रसिकांच्या हक्काचे असलेले शाहू कलामंदिर येत्या १५ दिवसांत चालू करणार असल्याचे आश्‍वासन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.

सांगली महापालिकेच्या पुस्तक बँकेला राजेश नाईक फाऊंडेशन वाचनालयाकडून १०१ पुस्तकांची भेट

फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि विमा सल्लागार संदीप आपटे यांचा विमा व्यवसायातील उत्तम कामगिरीविषयी आयुक्त कापडणीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यवतमाळ येथे वीजदेयक दरवाढीच्या विरोधातील भाजपच्या आंदोलनामध्ये पत्रकाराला पोलिसांकडून मारहाण !

या मारहाणीचा भाजपचे आमदार मदन येरावार यांनी निषेध व्यक्त करून पोलीस कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

नगरसेवकांच्या समर्थकांचा ठोसेघर (जिल्हा सातारा) येथे मद्यप्राशन करून धिंगाणा

अरेरावी करणार्‍या मद्यपींवर नियंत्रण मिळवू न शकणारे स्थानिक प्रशासन !

पुणे येथे पोलिसांकडूनच पोलिसी गणवेश घालण्याच्या नियमांचे पालन नाही

नागरिकांना शिस्तीचे धडे देणारे पोलीसच शिस्त पाळत नसतील, तर अशा पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक कसा रहाणार ?

शेळकेवाडी (तालुका कवठेमहांकाळ) येथे भेसळयुक्त दूध जप्त

भेसळीच्या संशयावरून शेळकेवाडी (तालुका कवठेमहांकाळ) येथे ४ फेब्रुवारी या दिवशी मे. सटवाई दूध संकलन केंद्रावर धाड टाकून एक लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.