
सातारा, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – सातारावासीय रसिकांच्या हक्काचे असलेले शाहू कलामंदिर येत्या १५ दिवसांत चालू करणार असल्याचे आश्वासन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.
उपनगराध्यक्ष मानोज शेंडे म्हणाले की, शाहू कलामंदिर वर्षभरापासून नूतनीकरणासाठी बंद आहे. कोरोनाकाळात सर्वच मनोरंजनात्मक कार्यक्रम बंद होते. या वेळेचा सदुपयोग व्हावा या कारणासाठी शाहू कलामंदिर नूतनीकरणासाठी प्रारंभ केला; मात्र ज्या ठेकेदाराने काम घेतले, तो मधेच काम सोडून गेला. याविषयी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासमवेत चर्चा झाल्यानंतर त्यांनी १५ दिवसांत शाहू कलामंदिर नाट्यरसिकांसाठी चालू करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे सर्व संबंधित विभागांना सूचना देऊन ८ फेब्रुवारीपासून कामास प्रत्यक्ष प्रारंभ करणार आहोत. १५ दिवसांत काम आटोपून नाट्यरसिकांसाठी शाहू कलामंदिर चालू करून देण्यात येईल.
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !