आईने पंजाबी पोशाख घातल्याने मुलाची आत्महत्या

नागठाणे (जिल्हा सातारा) येथील एका मुलाने त्याच्या आईने पंजाबी पोशाख घातल्याच्या कारणावरून आत्महत्या केली. शेरू शैकत भोसले असे मुलाचे नाव आहे.

सिंदफळ (जिल्हा धाराशिव) येथे शिवजन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

शिवजन्मोत्सवानिमित्त २२ फेब्रुवारी या दिवशी श्रीराममंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी सर्वश्री दिनेश धनके, अक्षय नवगिरे, क्रांती धनके, आकाश मिसाळ, समाधान घाटशिळे, बबलू धनके, शुभम हजारे, अमोल घाटशीळे, ऋषि कुलकर्णी इत्यादींनी परिश्रम घेतले.

कोल्हापूर येथे २७ फेब्रुवारी या दिवशी अखंड श्रीराम नामजपाचे आयोजन !

सद्गुरु कृपेने २७ फेब्रुवारी या दिवशी पौर्णिमेच्या निमित्ताने पहाटे ५ ते सायंकाळी ६ या वेळेत १३ घंटे ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामजप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार !

येथील सुखसागर परिसरात एकाच रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे २ स्वतंत्र कार्यादेश (वर्कऑर्डर) २ वेगवेगळ्या ठेकेदारांना महापालिका प्रशासनाने दिले. प्रत्यक्ष काम चालू करतांना हा प्रकार लक्षात आल्याने महापालिकेच्या अजब आणि मनमानी कारभाराची चर्चा होत आहे.

गुंड गजा मारणेच्या मुळशीतील फार्म हाऊसवर पोलिसांची धाड

कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर आतापर्यंत पुणे, पिंपरी चिंचवड आणि खालापूर येथील पोलीस ठाण्यांत ६ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

अस्लम शेख यांनी भेंडीबाजार आणि बेहराम पाडा येथेही मास्क लावण्याचा सल्ला द्यावा ! – संदीप देशपांडे, मनसे

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ‘मास्क लावला नाही, तर दळणवळणबंदी करावी लागेल’, असे सांगितले. हाच सल्ला त्यांनी जरा भेंडीबाजार आणि बेहरामपाडा येथेही द्यावा, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे.

कामकाजाची पहाणी करून अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे पुरातत्व विभागाला निर्देश

श्रीरामाने निर्माण केल्याचा धार्मिक आणि  ऐतिहासिक वारसा असलेला वाळुकेश्‍वर येथील बाणगंगा कुंड विकासक इमारतीसाठी करत असलेल्या खोदकामामुळे बाधित झाले आहे.

मालेगावच्या सेंट्रल चित्रपटगृहात चित्रपट चालू असतांना प्रेक्षकांनी फोडले फटाके

मालेगावच्या सेंट्रल चित्रपटगृहात चित्रपट चालू असतांना काही प्रेक्षकांनी फटाके फोडले. फटाके फोडणार्‍या अज्ञात प्रेक्षकांविरोधात चित्रपटगृहाच्या मालकाने पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.

‘व्हिप’ डावलणार्‍या ७ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होणार ! – दीपक शिंदे-म्हैसाळकर, भाजप

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करण्यासाठी भाजपकडून ‘व्हिप’ काढण्यात आला होता.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते ‘युवा गंधर्व’ पुरस्काराचे वितरण

सुंद्रीकला अकादमीच्या वतीने येथील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये आयोजित केलेल्या संगीत प्रतिभा महोत्सवात सुंद्रीवादन, कथ्थक, भरतनाट्यम्, मोहिनी अट्टम आदी विविध संगीतांच्या कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले.