आईने पंजाबी पोशाख घातल्याने मुलाची आत्महत्या

सातारा – नागठाणे (जिल्हा सातारा) येथील एका मुलाने त्याच्या आईने पंजाबी पोशाख घातल्याच्या कारणावरून आत्महत्या केली. शेरू शैकत भोसले असे मुलाचे नाव आहे. त्याने घराजवळील झाडाला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. (मानवी जीवन अमूल्य असतांना ते क्षुल्लक कारणावरून आत्महत्या करून संपवणे अयोग्य आहे. – संपादक)