पाचगणी (जिल्हा सातारा) प्राधिकरण कार्यालयात अभियंता आणि शाखाधिकारी यांच्यात हाणामारी

गत ४ दिवसांपासून पाचगणी शहरातील एका भागात पाणीपुरवठा न झाल्यामुळे नागरिकांनी प्राधिकरण कार्यालय गाठले; मात्र समस्येवर उपाय न काढता वरिष्ठ अभियंता आणि शाखाधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. याचे रूपांतर पुढे हाणामारीमध्ये झाले.

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथील एका रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू ठेवल्याचे भासवून खोडसाळपणा ! – जयसिंगपूर पोलीस

जयसिंगपूर येथील एका रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू ठेवल्याचे भासवून कुणीतरी खोडसाळपणा केला आहे. कोल्हापूर बॉम्बशोधक पथकाने याविषयी सखोल पहाणी केल्यावर यात ठेवलेल्या वस्तूंमध्ये प्लास्टिकचे छोटे पाईप गुंडाळून ठेवलेले आढळले. यात कोणतीही स्फोटके मिळालेली नाहीत.

कोपरा किनगाव (जिल्हा लातूर) येथील सरपंचासह १६ जणांविरोधात गुन्हा नोंद

अहमदपूर तालुक्यातील कोपरा किनगाव येथे पीडित मुलीच्या घरासमोरील जागेत असलेले देवीचे मंदिर आणि मूर्ती पाडण्यास विरोध करणार्‍या पीडित मुलीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांसह १६ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोटे (खेड) येथील घरडा केमिकल्समध्ये स्फोट : ४ जणांचा मृत्यू आणि १ जण घायाळ

गेल्या वर्षभरातील लोटे एम्.आय.डी.सी.मधील ही सहावी घटना असून तिथे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.

पुण्यात पीएमपी ५० टक्के प्रवाशांनाच अनुमती

बसमध्ये १७ ते २१ इतकेच प्रवासीच बसू शकतील. या सर्व डेपोच्या व्यवस्थापकांना बसमध्ये सुरक्षित अंतर राखणे आणि सॅनिटायझेशन यांविषयीच्या सूचना दिल्या आहे.

सातारा शहर आणि परिसरात ३२ ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवण्याचे काम चालू

पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याविषयी केलेल्या पाठपुराव्यामुळे मिळालेल्या निधीतून ३२ ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ शहर आणि परिसरात बसवण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे.

सातारा येथील सैनिक स्कूलमधील ३ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा

दळणवळण बंदीमुळे गावाला गेलेलेे विद्यार्थी शाळेसाठी परतले आहेत. शाळेत आल्यानंतर अशा विद्यार्थ्यांची कोविड चाचणी घेण्यात आली. तेव्हा ३ विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.

सातारा येथे वीजजोडणी तोडण्यासाठी गेलेल्या २ वीज कर्मचार्‍यांना अमानुष मारहाण

दळणवळण बंदीच्या काळात वीजदेयके थकवणार्‍या नागरिकांची वीजजोडणी तोडण्याचे काम महावितरणने हाती घेतले आहे. त्याअंतर्गत वीजजोडणी तोडण्यासाठी हे कर्मचारी गेले होते. मारहाणीच्या घटनेनंतर महावितरण कर्मचार्‍यांनी काही काळ कामबंद आंदोलनही केले.

पाटण (जिल्हा सातारा) येथे संतप्त नागरिकांनी रस्ते खोदण्याचे काम बंद पाडले !

प्रशासन यामध्ये स्वतःहून लक्ष का घालत नाही ? जे नागरिकांना दिसते, ते प्रशासनाला का जाणवत नाही ? ‘असे असंवेदनशील प्रशासन काय कामाचे’, असा प्रश्‍न जनतेला पडल्यास चूक ते काय ?

पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाला २५ लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी चौघांना अटक

२५ लाख रुपये मूल्याच्या २ सहस्र रुपयांच्या चलनी नोटा दिल्यास, दुप्पट मूल्याच्या अर्थात् ५० लाख रुपये मूल्याच्या ५०० च्या नोटा देण्याचे प्रलोभन दाखवून शिवणे येथील हॉटेल व्यावसायिकाला २५ लाख रुपयांना फसवल्याचा प्रकार उघडकीस आला.