सातारा – ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ अंतर्गत सातारा नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना जागृत करण्यासाठी चौकाचौकात फलक लावण्यात आले आहेत; मात्र दुर्दैवाने शहरातील राजपथावर खणआळीच्या कोपर्यावर ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ च्या फलकाखालीच कचर्याचा ढीग लावण्यात आला आहे. कचर्याचे ढीग मोकाट कुत्री विस्कटून टाकत असल्यामुळे शहरातील रस्त्यांचे विद्रुपीकरण होत आहे. कचरा करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून येत आहे.