कोरोनाविषयक नियमांची आजपासून कठोर कार्यवाही; नियम मोडणारी आस्थापने ‘सील’ करणार ! – नितीन कापडणीस, आयुक्त

सांगली, २९ मार्च (वार्ता.) – कोरोनाचा संसर्ग परत वाढत आहे. जानेवारी, फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च मासात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे ३० मार्चपासून कोरोनाविषयीच्या नियमांची कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे. आस्थापनांना रात्री ८ पर्यंतच खुले ठेवण्याची मुभा देण्यात आली असून नियम मोडणारी आस्थापने ‘सील’ करण्यात येणार आहेत. याचप्रमाणे गृह अलगीकरणात असूनही जे नागरिक बाहेर फिरतांना … Read more

माळशिरस (सोलापूर) येथे बसस्थानका समोरील ९ दुकानांना आग !

शहरातील बसस्थानकासमोरील ९ दुकानांना २८ मार्चच्या पहाटे आग लागली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. विश्‍वनाथ वडजे यांना पंचनामा करून हानीग्रस्तांना अधिकाधिक साहाय्य मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले.

मुंबईत कोरोना लसीकरणाचा १० लाखांचा टप्पा पार !

१ मार्चपासून तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण चालू झाले. या अंतर्गत आज लसीकरणाच्या संख्येचा १० लाखांचा टप्पा पार झाला असून आजपर्यंत एकूण १० लाख ८ सहस्र ३२३ इतके लसीकरण करण्यात आले आहे.

पंढरपूर विधानसभेच्या मतपत्रिका ज्येष्ठ नागरिक आणि कोविड रुग्ण यांना टपालाद्वारे पुरवणार

मतदानासाठी ज्येष्ठ नागरिक (८० वर्षांहून अधिक), ‘कोविड १९’ संशयित आणि कोरोनाबाधित रुग्ण यांना मतदान करता यावे, यासाठी टपाली मतपत्रिका पुरवणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

प्रभादेवी येथील इलेक्ट्रिक वायरच्या गोदामाला आग

वायरच्या गोदामाचा तळमजला आणि बेसमेंटमध्ये आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मांजरा धरणाचा उजवा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले

ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत कालवा फुटणे पाटबंधारे विभागासाठी लज्जास्पद आहे. कालव्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

१७ घंट्यांनंतर कोरोनाग्रस्ताचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन

रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार !

स्वतःच्या मुलीचा विनयभंग करणार्‍या वडिलांना अटक

नैतिकतेचा र्‍हास झाल्याचे उदाहरण !

अज्ञात वाहनाच्या धडकेने सातारा पोलीस दलातील कर्मचार्‍याचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत घायाळ झालेले सातारा पोलीस दलातील कर्मचारी संग्राम शिर्के यांचा रुग्णालयात उपचार चालू असतांना मृत्यू झाला आहे. संग्राम शिर्के हे वाई येथील उपविभागीय पोलीस कार्यालयात कर्तव्यावर होते.

कराड शहरात ३४ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) !

शहरात गत ५ ते ६ दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे कराड शहर परिसरात ३४ ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) निर्माण करण्यात आले आहेत.