पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक १७ एप्रिल या दिवशी होत असून या मतदानासाठी ज्येष्ठ नागरिक (८० वर्षांहून अधिक), ‘कोविड १९’ संशयित आणि कोरोनाबाधित रुग्ण यांना मतदान करता यावे, यासाठी टपाली मतपत्रिका पुरवणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली, त्यात ते बोलत होते.
या बैठकीत शंभरकर यांनी प्रतिनिधींना निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती दिली, तसेच ‘मतदान प्रक्रिया, प्रचार यांमध्ये ‘कोविड १९’च्या नियमांचे पालन करणे आवश्यक असून कोविडच्या अनुषंगाने प्रत्येक मतदान केंद्रावर १ सहस्राहून अल्प मतदार संख्या असणे आवश्यक आहे’, असे मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.