
सातारा, २८ मार्च (वार्ता.) – अज्ञात वाहनाच्या धडकेत घायाळ झालेले सातारा पोलीस दलातील कर्मचारी संग्राम शिर्के यांचा रुग्णालयात उपचार चालू असतांना मृत्यू झाला आहे. संग्राम शिर्के हे वाई येथील उपविभागीय पोलीस कार्यालयात कर्तव्यावर होते.
२५ मार्चच्या रात्री १० वाजता पुणे-बेंगळुरू महामार्गावर त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातस्थळी उपस्थितांनी शिर्के यांना तातडीने रुग्णालयात नेले; मात्र २६ मार्चच्या रात्री रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मावळली. या प्रकरणी शिर्के यांच्या वडिलांनी भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !